Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनसुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट

सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट

मुंबई – Mumbai

ChILD Of GOD…… म्हणतं अखेर अंकिता लोखंडेने एक महिन्यानंतर व्यक्त केल्या आपल्या भावना. अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला आज १४ जुलै रोजी एक महिना झाला आहे. आज अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

- Advertisement -

या फोटोत तिने देवासमोर एक दिवा लावला असून ChILD Of GOD… असं म्हटलं आहे. तिने तिच्या घरातील देव्हार्‍यासमोर हा दिवा लावला आहे. सुशांतला आठवत तो परमेश्वराचं बाळ आहे असं म्हटलं आहे. तिने सुशांतला अतिशय शांतपणे आठवलं आहे.

१४ जून रोजी राहत्या घरी सुशांतने गळफस लावून आत्महत्या केली. सुशांतची आत्महत्या हा सार्‍यांनाच मोठा धक्का होता. त्याच्या आत्महत्येनंतर अंकिता आपल्या आईसोबत सुशांतच्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. त्यानंतर ती पटनाला त्याच्या गावी देखील गेल्याचं सुशांतच्या वडिलांनी सांगितलं.

’पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत दोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघं एकमेकांपासून लांब झाले आहेत. सुशांतच्या जाण्यानंतर अंकिताने स्वत:ला आयसोलेट करून घेतलं. पण आता अखेर एका महिन्यानंतर तिने स्वत:च्या भावनांना वाट करून दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात सरपंच पदाच्या आरक्षणासाठी तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार्‍या जिल्ह्यातील एक हजार 223 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने 5 मार्च रोजी...