Saturday, July 27, 2024
Homeनगरचत्तर हत्याकांडप्रकरणी काँग्रेसची निदर्शने

चत्तर हत्याकांडप्रकरणी काँग्रेसची निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राणघातक हल्ल्यात मृत्यूशी झुंज देणार्‍या अंकुश चत्तरच्या मृत्यूनंतर काँग्रेसने आक्रमक होत रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार, गृहमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. यावेळी खुनाचा मूळ सूत्रधार भाजपचा नगरसेवक आहे. राज्यात भाजप प्रणित सरकार आहे. गृहमंत्री भाजपचे आहेत. तेच नगरचे प्रभारी आहेत. सावेडीसह शहरातील हिंदुत्ववादी चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा बळी भाजप, राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते घेत असल्याचा तीव्र संताप कॉग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त व्यक्त केला.

- Advertisement -

आंदोलनात मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अनिस चुडीवाला, उषाताई भगत, नाथा अल्हाट, गंगाधर जवंजाळ, विलास उबाळे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, निजाम जहागीरदार, प्रणव मकासरे, गणेश आपरे, असोफियान रंगरेज, तुषार मांडोळे, जयराम आखाडे, राजेंद्र तरडे, बाबासाहेब वैरागर, विजय शिंदे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर लोकप्रतिनिधी एसपींना निवेदन देत कायदा- सुव्यवस्था ढासळल्याच्या आरोप करत आहेत.

ही त्यांची नौटंकी सुरू असून भाजपचा आरोपी नगरसेवक, भागानगरे हत्याकांडातील आरोपी, हे सगळे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. राजकारण्यांनी शहरात पेरलेले गुन्हेगारीच्या बीजाचा आता महावटवृक्ष झाला आहे. यामुळे तरुणाई, शहर मात्र बरबाद झाले आहे, विकास खुंटला आहे. शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालायचा असेल तर त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आधी एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातील सगळ्या आरोपींना तात्काळ तडीपार करावे, अशी जाहीर मागणी काळेंनी एसपी राकेश ओलांकडे केली आहे.

नितेश राणेंवर काँग्रेसचा घाणाघात

नगरमधील वातावरण दूषित करण्याचे काम भाजप नेते आ. नितेश राणे वेळोवेळी करतात. यापूर्वी देखील त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शहरात जातीय दंगल भडकेल अशा पद्धतीने गरळ ओकली आहे. आता त्यांच्याच नगरसेवकाने हत्याकांड केले आहे. हिम्मत असेल तर राणेंनी त्यांच्या गृहमंत्र्यांना अधिवेशनात जाब विचारून दाखवावा, असे जाहीर आव्हान काळेंनी राणेंना दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या