Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें (Anna Hajare) यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे भरती करण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने आज सकाळी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या