पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर (Decisions to Sale Wine from the Grocery Store) आंदोलन (Movement) करायचं की नाही याचा निर्णय रविवारी घेणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या उपोषणाच्या इशार्यानंतर (Fasting Movement Hint) राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग (Principal Secretary of State Excise Valsa Nair Singh) यांनी राळेगण (Ralegan Siddhi) येथे धाव घेतली होती. अण्णांशी (Anna Hazare) त्यांनी तीन तास चर्चा केली. या चर्चेनंतर आपलं 50 टक्के समाधान झाले, असे अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी सांगितले. उपोषणासंबंधी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग (Principal Secretary of State Excise Valsa Nair Singh) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी चर्चा करताना उपोषण (Fasting Movement) टाळण्याची विनंती केली आहे. नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील (Nashik Division Deputy Inspector General of Police BG Shekhar Patil) या चर्चेवेळी उपस्थित होते. यावेळी वाईन विक्रीला हजारे यांचा असणार तीव्र विरोध, सोमवारपासून दिलेला उपोषण करण्याचा इशारा यावर चर्चा झाली आहे. किराणा दुकानात वाईन विक्री करण्यापूवी त्यावर जनतेकडून हरकती, त्यांचे अभिप्राय मागवण्यात येणार आहेत. ग्रामसभेच्या परवागनीनंतरच हा निर्णय अंतिम करण्यात येणार आहे. वाईन विक्रीचा निर्णय वेगवेगळ्या टप्प्यावर पडताळून पाहिल्यावर अंतिम होणार असल्याने हजारे यांनी उपोषणाची घाई करू नयेत, अशी विनंती केल्यानंतर अण्णांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.