Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याद दारूचा नव्हे तर द दुधाचा!

द दारूचा नव्हे तर द दुधाचा!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सरत्या वर्षांला निरोप देतांना व नववर्षाचे स्वागत ( Welcome to New Year )करतांना मद्याच्या (liquor )आहारी जाऊ नये,असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या(Maharashtra Superstition Eradication Committee Nashik District ) वतीने करण्यात आले.

या निमित्ताने हुतात्मा स्मारक समोर ‘द दारूचा नव्हे तर द दुधाचा’ प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. नाशिककरांना मद्याचे दुष्परिणाम पटवून देत मोफत मसाला दुधाचे वाटप (Distribution of free masala milk )केले.यावेळी ‘चला व्यसनाला बदनाम करू या ‘, ‘ नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर’ अशा घोषणा देण्यात आल्या.

नववर्षाचे स्वागत फटाके फोडून व प्रदुषणाने करू नका .नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा ,असे आवाहनही करण्यात आले.या अनोख्या प्रबोधन कार्यक्रमाचे लोकांना कौतुक वाटले.

या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ.टी.आर.गोराणे , कृष्णा चांदगुडे,राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री,ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे,विजय खंडेराव, दिपक वर्दे, नितीन बागुल आदी कार्यकर्त उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या