Friday, March 28, 2025
Homeमनोरंजन८१ व्या मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा; जेष्ठ गायिका आशा भोसले यंदाच्या...

८१ व्या मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा; जेष्ठ गायिका आशा भोसले यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या (Master Dinanath Mangeshkar Memorial Foundation) वतीने काही मानाचे पुरस्कार देण्यात येतात. याबाबत दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली.

- Advertisement -

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhonsale) या यंदा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्याबरोबरच विद्या बालन, पंकज उदास, (Pankaj Udas) प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायिका उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पष्णमुकानंद नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी ६ वाजता हा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात होणार आहे.

IMD कडून राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट… आरोग्याची ‘या’ पद्धतीने काळजी घ्या आणि सुरक्षित रहा

मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सुप्रिया सुळे म्हणतात, १५ दिवसांत दिल्ली अन् महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट…

या सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात कथक होणार आहे. तर राहुल देशपांडे यांची सुरेल मैफल देखील होणार आहे. तसेच कार्यक्रमाची सांगता हरीहरन यांच्या सादरीकरणाने होणार आहे.

मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची यादी

विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),

विशेष पुरस्कार –प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)

विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)

सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’

श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)

वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुनावणी संपताच कोर्टात राडा; प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला, पोलीसांनी हल्लेखोराला पकडलं

0
कोल्हापूर | Kolhapurइतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न...