Monday, November 25, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, जाणून घ्या स्पर्धेचे वेळापत्रक, संघ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, जाणून घ्या स्पर्धेचे वेळापत्रक, संघ

दिल्ली | Delhi

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतीय संघात आयपीएल 2020 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यात ३२ क्रिकेटपटू आहेत. सर्व खेळाडू आयपीएल संपल्यानंतर एकाच विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. टी ट्वेंटी, वन डे आणि टेस्ट या तिन्ही प्रकारांसाठी ३२ खेळाडूंमधूनच तीन टीम तयार करण्यात आल्या आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 टीममध्ये दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि इशांत शर्माची निवड करण्यात आली नाही. लोकेश राहुल एकदिवसीय, टी-20 चा उपकर्णधार असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया तीन टी -20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे.

भारताच्या कसोटी संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टी -20 संघात स्थान मिळाले आहे.

आयपीएलमध्ये रोहित शर्माला दुखापत झाली असल्यामुळे गेल्या दोन सामन्यात तो खेळू शकलेला नाही. त्यामुळे टी -20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इशांत शर्माच्या नावाचाचा संघात समावेश नाही. बीसीसीआयने म्हटले की, बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित आणि ईशांतवर नजर ठेऊन आहेत. या संघात संजू सॅमसनलाही स्थान मिळाले आहे. शुभमन गिलला कसोटी संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर कसोटी संघात ऋषभ पंत आणि रिद्धिमान साहाचा समावेश करण्यात आला आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. कसोटीत मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ असे दोन सलामीवीर पर्याय आहेत. तर केएल राहुल तिसरा पर्यायही आहे. पण राहुलचा अनुभव पाहता त्याला पसंती दिली जाऊ शकते. एकदिवसीय संघात शुभमन गिल, मयंक अग्रवाल आणि शार्दुल ठाकूरला स्थान मिळाले आहे. रोहितच्या जागी एकदिवसीय आणि टी -20 सामन्यात मयंक अग्रवालची निवड झाली आहे. त्यामुळे मयंक शिखर धवन याच्यासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकेल. शुभमन गिल हा सलामीवीर म्हणून तिसरा पर्याय असू शकेल.

असा असेल संघ

कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

T-20 संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

वन डे

१. पहिली वन डे – २७ नोव्हेंबर, सिडनी

२. दुसरी वन डे – २९ नोव्हेंबर, सिडनी

३. तिसरी वन डे – १ डिसेंबर, कॅनबेरा

T-20

१. पहिली टी ट्वेंटी – ४ डिसेंबर, कॅनबेरा

२. दुसरी टी ट्वेंटी – ६ डिसेंबर, सिडनी

३. तिसरी टी ट्वेंटी – ८ डिसेंबर, सिडनी

कसोटी

१. पहिली टेस्ट – १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच)

२. दुसरी टेस्ट – २६ ते ३० डिसेंबर

३. तिसरी टेस्ट – ७ ते ११ जानेवारी

४. चौथी टेस्ट – १५ ते १९ जानेवारी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या