Friday, May 31, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ - वृश्चिक : पती-पत्नीचा भाग्योदय...

वार्षिक भविष्य २०२४ – वृश्चिक : पती-पत्नीचा भाग्योदय…

पुरुष – वृश्चिक राशी ज्या पुरुषांची आहे. त्यांना नवीन वर्ष हे मिश्रीत स्वरुपाचे असणार आहे. या वर्षाचा आरंभ हाच आपल्या आरोग्याच्या समस्या वाढविणारा आहे. जी शब्द मंडळी आजपर्यंत दबत होती ती या काळात आपणापेक्षा वरचढ होणार आहेत. या आपले विरोधात्मक वागणार आहेत. याबाबत आपण प्रतिकार न करता जे-जे होईल ते-ते बघावे. उगाच विरोधात ऊर्जा घालवण्यापेक्षा सकारात्मक राहावे. ढैय्या साडेसातीचा हा काळ घालवावा. अविवाहितांचे विवाह ठरतील. मनाप्रमाणे संततीचा लाभ होणार आहे.

महिला – ढैय्या साडेसाती काळ आपणास पती-पत्नी नात्यामध्ये दुरावा करणारा आहे. पतीपासून दूर गेले भाग्यहानी, पतीसमवेत जीवन आयुष्यातील अत्यंत भाग्यकारक घटना घडणार आहेत. पती-पत्नीचा संसार का? कुटुंबाचे हित हा प्रश्न आपलेसमोर उभा राहणार. मानसिक चिंता व्यथा यामुळे शारीरिक अनारोग्य, इतरत्र जुनाट व्याधी पूर्ण नाश होईल. या वर्षात दूरवर प्रवास करण्याचे योगाची तयारी ऐनवेळी रद्द करावी लागणार आहे. ज्या नातेवाईकांचा अनुभव आपणास चांगला नाही, असे नातेवाईकांच्या संपर्कात राहूच नका, उगाच मनस्ताप नको.

- Advertisement -

नोकरवर्ग – नोकरवर्गाचा प्रथम सहा महिन्यांचा काळ हा जरा त्रासदायक असणार आहे. या काळात आपले हातून चुका होणार आहेत. याविषयी वरिष्ठ अधिकारी वर्गाचा राग पण आपणास सहन करावा लागेल. ही बाब फार मनावर घेऊ नये. आपण ही वेळ आपणावर परिणाम करणारी करु नये. या वर्षाचा उत्तरार्ध हा नोकरीत भाग्यकारक असणार आहे. ज्यांना नोकरीच्या इच्छा आहे, त्यांना नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. ज्यांना कामाच्या संधी हव्या आहेत त्यांना कामाच्या संधीचा लाभ होणार आहे. नोकरीसोबत आपण व्यवसाय करीत असाल याबाबत समाधान असावे.

व्यवसाय – या वर्षातील प्रथम सहामाही आपणास आणि उत्तम असणार आहे. हा काळ आपणास व्यवसाय करण्यासाठी अपूर्ण पडणार आहे. हा काळ व्यापार करण्यासाठी धावपळीचा असेल. आपला कोणताही व्यवसाय असो, आपण आपले अनुभवानुसार धाडसाने व्यवसाय करा. स्टॉक करा. तेजी-मंदीचा लाभ या वर्षात आपले घरातील कोणासही व्यवसायात सामील करुन घ्यावयाचे असल्यास हा काळ अत्यंत योग्य आहे. आपला व्यवसाय वाढवावयाचा असल्यास वाढवावा अथवा आपणास दुसरी व्यवसायाची शाखा सुरु करावयाची असल्यास सुरु करावी.

विद्यार्थीवर्ग – येते नवीन वर्ष आपणास सामान्य जाणार असल्याचे ग्रहसंकेत आहेत व यावर्षी शालेय कामासाठी अधिक खर्च पण करावा लागणार आहे. यावर्षी आपणास शालेय प्रवेश घ्यावयाचा असल्यास अधिक पैसे लागणार आहेत. ग्रहयोग सामान्य आहेत म्हणून आपण आपले शालेय कामासाठी अधिक लक्ष द्यावे. चुकीच्या मित्रांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. तसेच चुकीच्या मित्राकडून आपणास त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल. याविषय रितसर शाळेकडे तक्रार करावी. परस्पर तक्रारी निपटण्याचा प्रयत्न करु नये. आपण यावर्षी यशस्वी व्हाल.

राजकारणी – आपली मुले मोठी झालेली आहेत. आपली इच्छा त्यांनी राजकारणात यावे, अशी आहे परंतु त्यांची नसेल तर त्यांना राजकारणात आणू नका. त्यांच्यादृष्टीने राजकारण गेले चुलीत असेच राहावे. आपण स्वत: राजकारणाच्यादृष्टीने हे नवीन वर्ष आपणास यश मिळून देणारे असणार आहे. आपले राजकारणातील सहयोग्यांची उत्तम साथ मिळणार आहे. आपले पक्षातील स्थान मागील वर्षापेक्षा अधिक बळकट होणार आहे. वरिष्ठ पदप्राप्तीसाठी मात्र ऐनवेळी रद्द होण्याची शक्यता असल्यामुळे याबाबतीत आपण सावध असावे.

आरोग्य – वृश्चिक राशी ज्यांची आहे त्यांना नवीन वर्षातील सहा महिन्यांचा काळ आरोग्य चिंताकारक असणार आहे. या आजारपणाच्या काळात आपणास कौटुंबिक शांतता मात्र लाभणार नाही. कुटुंबात अनेक सदस्य आहेत. नातेवाईक मंडळी आहेत. परंतु आजारपणात आपण एकटेच असणार आहात. ऑपरेशन योगाची शक्यता आहे. डोकेदुखी, हृदयादी विकार, हाडांची दुखणी, डोळे, दातांची दुखणी त्रस्त करणारी असणार आहे. याबाबतीत आपण सावध असावे. शक्यतोवर रोग गंभीर होवू नये यासाठी प्रयत्न करावे, या बाबतीत प्रयत्नाला यश मिळेल.

नातीगोती – प्रस्तुत येते नवीन वर्षी नातेवाईकांसंबंधित ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. या काळात नको ती नातेवाईक मंडळी आपणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. समारंभ, विवाहकार्य यासाठी आमंत्रित पण करणार आहेत. या काळातील मागील अनुभव लक्षात घ्यावे. ही मंडळी त्यांच्या कार्यापुरतीच आपल्यासोबत संबंध ठेवणारी आहेत. नातेवाईकांपेक्षा समाज स्थानिक बरा आहे असेच आपणास म्हणावे लागणार आहे. वृश्चिक ज्येष्ठ व्यक्तींनी नातेवाईकांबाबत आपण वैयक्तिक भूमिका घेवूनच वागण्याचा प्रयत्न करावा.

आर्थिक – येते नवीन वर्ष वृश्चिक आर्थिकबाबतीत भाग्यकारक ठरणार आहे. आर्थिककार्याची घोडदौड सुरु राहणार आहे. आपणास ढैय्या साडेसाती असतांना श्री शनी महाराज आपणास धनी बनून येणार आहेत. हे वर्ष आपणास अधिकाधिक बचतीचे असणार आहे. आजची बचत उद्यासाठी फायदेशीर असते. बचतीचे ध्येय ठेवूनच आपण हे वर्ष बंधनकारक ठरवावे. ओळख परिचचितांसाठी प्रवास करावा लागणार आहे. मंगलकार्य, विवाहकार्यास इतर समारंभात सामील व्हावे लागेल. आर्थिक खर्चाबाबत हात राखून खर्च करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या