पुरुष – ज्या पुरुषांची मकर राशी आहे, जीवन आयुष्यभर विलंब भाग्य आपणास आतापर्यंत राहिलेले आहे. अशा लोकांना हे नवीन वर्षात भाग्य आपले धावतच राहील. एका पाठोपाठ एक यश संपादन आपण करणार आहात. आपण कुठलेही काम करा त्यात आपणास यश हे मिळणारच आहे. यावर्षीचे ग्रहयोगाचा उपयोग आपण जी कामे आजपर्यंत होत नव्हती, अशी कामे आपण यावर्षात संपन्न करुन घ्या. कौटुंबिक कामे जी होत नव्हती अशी कामे सुरु करुन घ्यावीत. अविवाहितांचे विवाह जमविण्यास हे नवीन वर्ष योग्य असेच आहे.
महिला – मकर राशी महिलांना नवीन वर्ष कौटुंबिक प्रगतीचे असणार आहे. या वर्षात विवाहित महिलांची अधिकाधिक स्वप्न पूर्ण होणार आहे. आजपर्यंत आपण भाड्याच्या घरात राहत होते. आपली स्वत:च्या मालकीचे घर हवे ही इच्छा असेल तर या वर्षात वास्तुयोगाचे स्वप्न पूर्ण होईल. आपणाजवळ प्लॉट आहे तर यावर्षी बांधकामास सुरुवात करा. याच वर्षात नविन घरात जाल. कुटुंबात मुला-मुलींचे विवाह कार्य संपन्न होतील. संतती इच्छुकांना आपले मनाप्रमाणे संततीचा लाभ होणार आहे. वाहन खरेदीचे योग आहेत.
नोकरवर्ग – नोकरी इच्छुकांनी नोकरीसाठी प्रयत्न करावेत. सरकारी नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. नवीन वर्षात नोकरीनिमित्ताने परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील. ऑटो क्षेत्रातील नोकरवर्गाचे या नवीन वर्षात भाग्याची बरसातच होणार आहे. सरकारी वकील मंडळी तसेच सरकारी ड्रायव्हर, मॅकेनिकल नोकरवर्गास अनेक सोयी-सवलतीचा लाभ मिळणार आहे व पगारवाढीचे स्वप्न पूर्ण होणारे आहेत. ज्यांना नोकरी करुन सोबत व्यवसाय करावयाचा असल्यास या वर्षात ज्योतिषशास्त्रानुसार व्यवसाय करावा.
व्यवसाय – कोरोना महामारीच्या काळात जे आपले व्यवसाय नुकसान झालेले असेल या नवीन वर्षात मागील नुकसान तर भरुन निघेल याशिवाय भरभरुन लाभ आपणास मिळणार आहे. लोखंडाचे व्यापारी, लोखंडी साहित्याची निर्मिती, कारखानदारी, डिझेल पेट्रोल पंप, ऑईल मिल्स, शेंगदाणा, तीळ, जवस, सरकी, एरंडी, मोहरी, मसाल्यांचे व्यापारी, वकील मंडळी, टर्नर, फिटर, ऑटोपार्ट व्यवसायीक या सर्वांना अधिक काम, अधिक लाभ मिळवून देणारे हे वर्ष असणार आहे.जेवढी मेहनत कराल तेवढा लाभ अधिक हे तत्व लक्षात ठेवा. नवीन व्यवसाय सुरु करण्यास उत्तम वर्ष असणार आहे.
विद्यार्थीवर्ग – मकर राशी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शालेय कार्यात कार्य करणारे गुरुजन इतर वर्गास त्यांचे प्रत्येक कार्यात अभुतपूर्व यश संपादन करणारे हे वर्ष आहे.वकील कायद्याचे शिक्षण, ऑटोपार्ट इंजिनिअर, इंटेरियल डेकोरेटर, टेलिकम्युनिकेशन, बी.एस्सी., एम.एस्सी.या विद्यार्थी वर्गास यश मिळवून देणारे वर्ष असेल. इतर विद्यार्थी कोणतेही शिक्षण घेत असल्यास थोडी मेहनत घ्यावी लागेल व आपणास पण यश मनाप्रमाणे मिळणार आहे. आपणास शालेयमार्फत कार्य करण्याच्या संधी दिल्या जातील.
राजकारणी – राजकारणी व्यक्तींमधील सौम्य वागणार्या व्यक्ती, सरळ चालणार्या सत्य वागणार्या व्यक्तीची दखल ऐनवेळी हायकमांड घेणार आहेत. आपणास पक्षाची मोठी जबाबदारीदेखील सोपविली जाईल. केंद्रातील राजकारणी व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष अतीउत्तम यश मिळणारे वर्ष असणार आहे. या वर्षात आपणास आपली पुढील पिढी राजकारणात उतरावयाची असल्यास उतरवावी. या पिढीची इच्छा नसल्यास त्यांना राजकारणात मुळीच आणू नये. खरे कार्यकर्ते व खोटे कार्यकर्ते यांची जाणीव ठेवूनच राजकारण करावे.
आरोग्य – मागील काळात मकर राशी व्यक्तींना आरोग्यासाठी खूप झगडावे लागले होते. बरीच धावपळ करावी लागली होती. कोरोना काळात दु:खद घटनांना सामोरे जावे लागलेले होते. ती धावपळ यावर्षी आपणास करावी लागणार नाही. पूर्ण वर्षभर आपणास स्वत: परिपूर्ण आरोग्याचा लाभ प्राप्त होणार आहे. जी जुनाट दुखणी वारंवार आपणास त्रासदायक ठरत होतील, अशी दुखणी कायमची नष्ट होवून आपणास दिलासा देणारी ठरणारी आहेत. या नवीन वर्षात औषधावर फारसा खर्च पण आपणास करावा लागणार नाही.
नातीगोती – यावर्षी आपणास तरुण नातेवाईकापासून सावध रहावे लागणार आहे. वृद्ध नातेवाईकांची सोबत आपण लाभणार आहे. याच वृद्ध नातेवाईकांचे आशीर्वादच आपणास पूर्णपणे आपले कार्यात यश मिळवून देणारे असणार आहे. नातेवाईकांच्या सहकार्याने घरातील तरुण-तरुणींचे विवाह कार्य ठरणार आहे. कार्य आपणास संपन्न करवून घ्यायचे आहे. हा उद्देश ठेवूनच नातेसंबंधितांशी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. दृष्टीआड गेलेल्या नातेवाईकांची भेट या नवीन वर्षात होणार आहे. स्थावर संपत्तीबाबत बोलणी होतील.
आर्थिक – ज्यांची मकर राशी आहे अशा समस्त स्त्री-पुरुष युवक वर्गाचे हाती संपूर्ण वर्षभर पैसा खेळता राहील. आपण जी कार्य हाती घ्याल त्या प्रत्येक कार्यातून आपणास आर्थिक लाभ होणार आहे. भूमीसंबंधित खरेदी असो का विक्री असो यातून आर्थिक लाभ होणार आहेत. नोकरदारांना प्रमोशन (बढती) मिळून पगारात वाढीव असा आर्थिक लाभ मिळेल. कर्ज असल्यास ते चुकते होईल. व्यापारी क्षेत्रात चारही बाजुने नफे मिळविले जातील. शासनाकडून आर्थिक लाभ मिळतील.