Monday, May 27, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ - मिथुन : लक्ष्मी आली घरा

वार्षिक भविष्य २०२४ – मिथुन : लक्ष्मी आली घरा

पुरुष – समस्त मिथुन राशी पुरुषांना नवीन वर्षाचा प्रथम सहा महिन्याचा काळ हा भरभराटीचा असणार आहे. हा काळ आपणास खरे अर्थाने प्रगतीचा असणार आहे. आपण ह्या कालात काहीही कार्य करा त्यात आपणास यश मिळणार आहे. त्यासोबत लाभ पण प्राप्त होणार आहेत. ह्या सहा महिन्यात आपणास जे काही करावयाचे आहेत, ज्या काही आपल्या इच्छा पूर्ण करावयाच्या आहेत त्यासाठी ग्रहांची साथ आपणास आहे. यामुळे आपल्या इच्छा सफल होणार आहे. या वर्षीच्या उर्वरीत सहा महिने आपणास समस्या, कष्ट, काही दु:ख, विवंचनांना सामोरे जावे लागणार आहे. नाते संबंध ह्या काळात दुरावतील. काळजी करणेचा हा काळ असेल.

महिला – समस्त मिथुन राशी महिलांना हा काळ अतीमहत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण संसाराच्या किल्लाच आपल्या ताब्यात येणार आहे. आपले माहेरास जाण्याचे योग आहेत. माहेरची मंडळी देखील आपणाकडे येणार आहे. वर्षभराचे पहिले तीन महिने संसारात वादाचे असणार आहेत. ह्यावेळेस आपण आपले हट्ट बाजूला ठेवून संसारात शांतता कशी राहील ह्याकडे लक्ष द्यावे. हा काळ संसार सांभाळण्याचा काळ आहे. पतीस वाहन चालवणेस मज्जाव करावा. त्यांना वाहन चालविण्याविषयी सुचना तरी द्याव्यात. स्वयंपाक करतांना आपण दक्षता घ्यावी. अग्निपासून सावध असावे.

- Advertisement -

नोकरवर्ग – सुरवातीचे वर्ष हे आपणास अत्यंत भाग्यकारक ठरणार आहे. आपले वरिष्ठ अधिकारी वर्गाची आपणावर खास मेहरबानी असणार आहे. यामुळे बढतीचे योगाची संभावना आहे. पगारवाढ ठरलेलीच आहे असे समजून चालावे. आपण ज्या ठिकाणी नोकरी करीत आहात ह्या ठिकाणी आपणास कमी पगार वाढत आहे व दुसरीकडे अधिक पगाराची नोकरी आपण बघत आहात तर आपणास नवीन जागी नोकरी उपलब्ध होईल. ज्यांना नोकरीची अपेक्षा आहे त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सरकारी नोकरी मिळविणेसाठी आपण प्रयत्न करावेत.

व्यवसाय – ह्या नवीन वर्षातील प्रथम सहा महिने आपलेच आहेत असे समजून धुमधडाक्याने व्यवसाय करावा. आपणास आपले अनुभवानुसार आपण मालाचे स्टॉक करूनच नफे मिळवावेत. आपणास नवीन व्यसाय सुरू करावयाचा आहे किंवा आहे तोच व्यवसाय वाढवावयाचा आहे तर आपण व्यवसायात वाढ करू शकतात. हे सर्व मात्र आपण वर्षभरातील प्रथम सहा महिनेतच करावे. दूरवर प्रवास करावयाचा असल्यास किंवा व्यापार व्यवसाय निमित्त दूरवर प्रवास करावयाचा असल्यास प्रवास करणे पूर्व वाहन सर्व्हिसिंग करूनच प्रवास आरंभ करावा.

विद्यार्थीवर्ग – या वर्षातील सुरवातीचे पाच सहा महिने आपणास उत्तम यश मिळवून देणारे असणार आहेत. नवीन स्पर्धा परिक्षा देणेस उत्तम काळ आहे. ह्या काळात शालेय प्रवेश आपण करणार आहात व त्यात काही कायद्याच्या अडचणी येत असल्यास त्या अडचणी दूर होणार आहेत. वकिली, कायद्याचे शिक्षण घेणारे, ऑटो पार्ट, इंजि. टेलीकम्युनिकेशन, संशोधक, शास्त्रज्ञ शास्त्र, अकाऊंट, गणित विषयक शिक्षण, बी.कॉम, एम.कॉम, अकाउंट कामकाज शिक्षण, टर्नर, फिटर ह्या शिक्षण विद्यार्थी वर्गांना हे वर्ष अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

राजकारणी – राजकारणी व्यक्तिंना हे वर्ष अतिउत्तम राहणारे आहे. वरिष्ठ राजकीय नेत्यांची आपणावर कृपा असणार आहे. खेडे गावातील राजकारण करणारी मंडळींना हे वर्ष उत्तमच असणार आहे. आपल्याला पक्ष बदल करावयाचा असल्यास या वर्षातील प्रथम पाच महिन्यात केलेला उत्तम राहील. ह्या नंतरचा काळ आपणास अनुकुल राहणार नाही. या अनिष्ट काळात आपण कार्य केले नाही तरी चालेल परंतु शब्दांचा वापर मात्र जपून करावा. आर्थिक व्यवहार गुप्तरितीनेच करावेत. कुणावरही विश्वास टाकण्याची ही वेळ नाही, हे समजावे.

आरोग्य – आरोग्याची काळजी आपणास घ्यावी लागणार आहे. प्रथमत: आपण छंद फंद विकार, व्यसनापासून दूर रहावे. पोटाचे विकार लिव्हर संबंधीत अनारोग्य, किडणी विकार चिंता कारक असण्याची संभावना आहे. त्याचप्रमाणे त्वचा विकाराचा प्रश्न चिंताकारक असणार आहे. यासाठी आपणास उपासनेची अत्यावश्यकता, गरज ही असणार आहे. फार मोठी मेहनतीची कामे करू नका. अवजड अशी कामे करणेचे टाळावे. यातून लहान मोठी जखम होणेची संभावना आहे. ह्या वर्षातील प्रथम सहा महिने आरोग्यदृष्ट्या उत्तम राहील.

नातीगोती – पत्नीचे नातेवाईकांची वर्दळ ह्या नवीन वर्षात अधिक राहणार आहे. आपले नातेवाईकांचे येणे जाणे कमी असणार आहे. आपण स्वत: अविवाहीत आहात तर मातृ नातेवाईकांचे संबंधातून विवाह ठरविला जाईल. आपली मुले मुली विवाह इच्छुक असल्यास मुलींचे विवाहास प्रेम योगाची संभावना व मुलांचा विवाह हा आपले पत्नीचे नातेवाईकातून होण्याची संभावना आहे. प्रथम सहा महिने नाते संबंधातील संबंध उत्तम राहणार आहेत व हाच काळ त्यांचे कडून मुला-मुलींचे बाबत विवाह ठरविणेचे सहाय्य घ्यावे.

आर्थिक – आपण नोकरी करणारे असाल तर हे वर्ष आर्थिक लाभाचे असणार आहे. आपले पगार वाढतील. मौल्यवान वस्तुंची खरेदी. वाहन खरेदीचे योग तसेच प्लॉटस खरेदी योग पण आहेत. व्यवसायीकांना प्रथम सहा महिनेचा काळ हा व्यापार करणेस अतिउत्तम आहे. आर्थिक दीर्घकालीन गुंतवणूक कराल. प्रथम सहा महिनेत उधारी उसनवारी वसूल होईल. ह्यानंतर असले व्यवहारात चिंता निर्माण होणार आहे. पैसा सुरक्षीत ठिकाणी ठेवावा. घराला कुलूप लावून बाहेर गावी मुळीच जावू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या