Tuesday, May 21, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ : मीन : सुख, संपन्नता, वैभवाची प्राप्ती

वार्षिक भविष्य २०२४ : मीन : सुख, संपन्नता, वैभवाची प्राप्ती

पुरुष – साडेसाती मीन राशी व्यक्तींना सुरु झालेली आहे. तरी पण या नवीन वर्षात शनी आपणावर मेहरबान असणार आहे. आपल्या ज्या काही इच्छा असतील, आपल्या काही भावी योजना असतील. त्या सर्वच्या सर्व या वर्षात सफल होणार आहेत. दूरवर प्रवासाच्या योजना मात्र रद्द करावे लागणार आहेत. छोटेखानी मंगलकार्य संपन्न केले जाईल. या वर्षात बाहेरील खाणे अधिक होईल. नातेवाईकांबाबत आपली पवले चुकीच्या दिशेने पडणार आहेत. यात आपले घराण्याचे हसे समोर होत असतांना आपले वैयक्तिक स्वार्थ बुद्धीने विरोध न करता बघत रहाल.

महिला – हे नवीन वर्ष आपणास नवरा माझे मुठीत गं! असेच वर्षभर असणार आहे. तरी पण सांसारिक प्रेमभाव यात किंचीत कमी न होता उलट वाढत जाणार आहेत. या वर्षात घरात मंगल कार्य ठरतील. मुले त्यांच्या कार्यात यशस्वी होतील. विवाहयोग जुळण्याचे हे वर्ष आहे. ज्याचे विवाहास फारच विलंब झालेला आहे. त्या सर्वांचे विवाह ठरणार आहेत. संतती इच्छुकांना संततीचा लाभ होईल. ज्यांच्या टेस्टट्युब बेबीला यश आलेले नाही त्यांनी यावर्षी टेस्टट्युबसाठी अवश्य प्रयत्न करावा. वास्तु खरेदीचे योग, वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत.

- Advertisement -

नोकरवर्ग – सरकारी नोकरांवर सरकार फारच मेहरबान असणार आहे. न मागता आपणास हव्या त्याठिकाणी बदली, हवी तशी पोस्ट व वाढीव पगाराचा लाभ पण मिळणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे अशा अनेक मीन राशी व्यक्ती तरुणांना सरकारी नोकरीच्या लाभाची शक्यता आहे. कंपनी नोकरीच्या भरपूर संधी प्राप्त होतील. कंपनी नोकरवर्गास परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील. ज्येष्ठ, वरिष्ठ नोकर अधिकारीवर्गास गाडी, बंगला, विविध सोयी-सुविधा प्राप्त होणार आहे. सरकारी नोकरांनी प्रलोभनापासून दूर रहावे.

व्यवसाय – नवीन वर्ष मीन राशी व्यापारी व्यवसायीकांना लाभ शुभ असेच जाणार आहे. आपणास साडेसाती आहे. याभीतीखाली व्यवसाय मर्यादित करु नका. शनी आपणावर या नवीन वर्षात मेहरबान होणार आहे. शनी धनी या रुपात आपणास बघावयास मिळणार आहे. आपण नवीन व्यवसाय सुरु करीत आहात तर ज्योतिषांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण व्यवसायास सुरुवात करावी. आपले अनुभवानुसार आपण स्टॉक करुन तेजी-मंदीच्या व्यापारात भरघोस लाभ मिळवावेत. व्यवसाय भावी नवीनीकरणास आपण नवीन रुप द्यावे.

विद्यार्थीवर्ग – मीन राशी विद्यार्थी गणांना मागील वर्षापेक्षा भरघोस यशाची प्राप्ती होणार आहे. गणिती, बी.कॉम., एम.कॉम., तसेच वैद्यकीय, मेडिकल, सर्जन, एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. या सर्वांना नवीन वर्ष उत्तम राहणार आहे. यावर्षी आपण मेडिकलला प्रवेश घेत आहात तर आपले प्रयत्नांना यश मिळेल. यश संपादन कराल. वकिली कायदा शिक्षण, बी.फार्म., एम.फार्म., बी.एस्सी., एम.एस्सी., पत्रकारिता, इंटेरियल डेकोरेटर, आर्किटेक्ट या समस्त विद्यार्थीवर्गास अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. यशाची अधिकाधिक शक्यता आहे.

राजकारणी – मीन राशी राजकारणी ज्यांचे वय साठचे जवळपास आहे त्यांना हे नवीन वर्ष उत्तम आहे. ज्यांची वय सत्तर जवळपास आहेत त्यांना जनतेपासून व हायकमांडपासून नकाराची भूमिका असण्याची शक्यता आहे. ज्यांची तीन टर्म झालेली आहे त्यांना चिंता, कारण हे नवीन वर्ष असणार आहे. ज्यांनी तीन टर्म पराजय स्वीकारलेला आहे त्यांना राजकारणात यावर्षी संधी मिळण्याची शक्यता आहे. काहींना राजकर्त्यांचाच विरोध होण्याचे योग आहेत. या नवीन वर्षी खर्चाचे प्रमाण डबल होण्याचे योग आहेत.

आरोग्य – नवीन वर्ष समस्त मीन राशी व्यक्तींना आरोग्य संपन्नतेचे जाणार आहे. ज्यांना डायबीटीज आहे त्यांनी मात्र आपले तब्येतीस सांभाळावे. मध्यम वयाच्या व्यक्तींनी आपले जुनाट विकार असतील तर त्याबाबत काळजी घ्यावी. शक्यतोवर बाहेरचे खाणे या वर्षात कमी करावीत. वृद्ध मीन राशी व्यक्तींची ऑपरेशन झालेली असतील त्यांच्या आरोग्यात निश्चितपणे सुधारणा होणार आहेत. ज्यांना या वर्षात ऑपरेशन करावयाची असल्यास लवकर करुन घ्यावीत. संधीवात, हाडांची दुखणीसाठी वेळ न घालविता ऑपरेशन करुन घ्यावीत.

नातीगोती – मीन राशी व्यक्तींना त्यांचीच नातेवाईक मंडळी इतर नातेवाईकांपासून गैरसमज करवून नातेवाईक तोडण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केलेला आहे. हे आपणास कळत असूनदेखील आपणास डोळेझाक करणे घातक ठरणारे आहेत. याबाबत सावध असावे. एखादे मंगलकार्यानिमित्त अधिक खर्च ही मंडळी करावयास लावणारी आहे. ज्या व्यक्तींची विवाह झालेली नाहीत त्यांना नातेवाईकांमुळे विवाहस्थळे येतील. यावर्षी अनेक मीन राशी मुला-मुलींचे विवाह संपन्न होणार आहेत. प्रेमविवाहदेखील सफल होणार आहेत.

आर्थिक – नवीन वर्ष साडेसातीची सुरुवात आपणास प्रगतीकडे घेवून जाणारी ठरणार आहे. वास्तु खरेदी, शेती खरेदी तसेच वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत. नवीन बांधकाम यावर्षी निश्चितपणे आपण करणार आहात. आपण व्यावायिक असाल अथवा सरकारी नोकरी, बीन सरकारी नोकरी असो, रोजंदारी मजूर व शेतकरीवर्गासदेखील नवीन वर्षात मागील वर्षापेक्षा अधिक आर्थिक लाभ होणार आहे. शषतकरीवर्गास शासकीय लाभ मिळतील परंतु नैसर्गिक आपत्तीला आपणास तोंड द्यावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या