Monday, July 22, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ - धनु : गतीमानाचे वर्ष असेल।

वार्षिक भविष्य २०२४ – धनु : गतीमानाचे वर्ष असेल।

पुरुष – ज्या व्यक्तींची धनू राशी आहे अशा समस्तांना हे नवीन वर्ष अत्यंत भरभराटीचे जाणार आहे. पूर्ण वर्षभर आपणास धावपळ करावी लागणार आहे. आपण या वर्षात जे कार्य कराल त्या कार्यात आपणास यश मिळेल. आर्थिक कामाकडे आपण अधिक लक्ष द्यावे कारण आर्थिक कार्यात आपणास सहयोग देणारे ग्रहयोग आहेत. या वर्षात काही आर्थिक समस्या असतील तर त्या बहुतांशी मार्गी लागतील. आपली संततींना नवीन शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यात काही कायद्याच्या अडचणी निर्माण होत असतील तर आपण प्रयत्न करा. कायद्याच्या अडचणी दूर होतील.

- Advertisement -

महिला – खास करुन धनू राशी महिलांना हे नवीन वर्ष प्रगतीचे जाणार आहे. ज्या महिला घरगुती कामकाज करीत आहेत, त्यांच्या हातात सर्वच कुटुंबियांची सूत्रे येणार आहेत. आपले कुटुंबियात लहान-मोठे मंगलकार्यदेखील संपन्न होणार आहे. पतीसोबत प्रवासदेखील होणार आहेत. यादरम्यान शॉपिंगदेखील मोठ्याप्रमाणावर करणार आहात. मोठ्या रकमेचे व्यवहार करतांना सावधानता बाळगावी. कायद्यालाच धरुन आपण ही कार्य करावीत. कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणारे महिलांना अतीउत्तम वर्ष जाईल.

नोकरवर्ग – वर्तमान जे नोकरी करीत आहेत त्यांना प्रस्तुत वर्ष प्रगतीचे जाणार आहे. या वर्षात प्रथम सहा महिन्यात आपली बढती होईल. पगारवाढ होईल. जी मंडळी सरकारी नोकरी करीत आहेत, त्यांना नवीन जबाबदारी सोपविली जाईल व भरघोस पगारवाढीची बढतीही मिळणार आहे. मात्र लोभापासून दूर रहावे नाहीतर कायद्याच्या कचाटीत सापडण्याचा धोका संपूर्ण वर्षभर राहणार आहे. सरकारी वकील मंडळींना येते नवीन वर्ष भरभराटीचे जाणार आहे. पायी चालणारे फोर व्हिलरमध्ये फिरु लागतील. वास्तु, प्लॉट खरेदीसुद्धा होणार आहे. नवीन जागी रुजू व्हाल.

व्यवसाय – व्यापारी, व्यावसायिकांना नवीन वर्षात जेवढा व्यापाराचा व्याप वाढविता येईल तेवढा व्यापार वाढवावा. आपले अनुभवानुसार मालाचे साठे करावेत व तेजी-मंदीचे खेळ खेळावेत. पण हे सर्व कायद्याला धरुनच करावे. कायद्याचे प्रश्न निर्माण झाले तरी त्याबाबत सर्वकाही बरोबर होईल. ज्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी या वर्षातील प्रथम सहामाहीत करावा. व्यवसाय करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्रानुसारच करावा. व्यवसायासाठी योग्य जागेची इच्छा असल्यास ती इच्छा सफल होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थीवर्ग – विद्यार्थीवर्गास मागील वर्षापेक्षा येते नवीन वर्ष आपणास आर्थिक लाभ मिळवून देणारे असणार आहे. आपण या नवीन वर्षात नवीन शाळेत दाखल होतांना काही कायद्याच्या अडचणी असल्यास त्या अडचणी दूर होतील. उत्तमप्रमाणे होस्टल आपणास मिळेल. यावर्षी आपणास उत्तम सहकारी, विद्यार्थी पण लाभणार आहेत. क्लासेस, अकॅडेमी परीक्षात आपण उत्तीर्ण होणार आहात. कायद्याचे शिक्षण घेणारे, बी.ई.मॅकेनिक, ऑटोपार्ट मॅकेनिक, टर्नर, फिटर, गणितविषयक शिक्षण मार्ग बी.कॉम., एम.कॉम., टेलिकम्युनिकेशन या विद्यार्थ्यांना उत्तम वर्ष. ग्रहांची अनुकूलता असली तरी यशासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करणे महत्वाचे आहे.

राजकारणी – ज्या मंडळींनी पक्ष बदल केलेला नाही. आहे त्याच जुन्या पक्षात कार्यरत आहेत. वयाची पन्नास-पासष्ठीपर्यंत आहेत, त्यांना हे वर्ष राजकारणात अतीउत्तम राहणार आहे. हायकमांड आपले कर्तृत्वाची व आपले वयाची पण दखल घेणार आहेत. आपलेसोबत जी कार्यकर्ते मंडळी आहेत ती या वर्षात अत्यंत नि:स्वार्थीपणे आपल्यासोबत कार्यरत राहणार आहेत. राजकारणी स्त्रीयांना हे वर्ष यशाचे व नवीन पदावर कार्यरत राहण्याचा मान मिळणार आहे. पतीच्या संमतीनेच राजकारण करावे. अथवा राजकारणात प्रवेश करावा.

आरोग्य – धनू राशी महिलावर्गास हाडांची दुखणी, संधीवाताची समस्या या वर्षात असणार आहे. आरोग्यासाठी गाव सोडून इतर गावी जावे लागणार आहे. पुरुषांना नवीन वर्षात डायबीटीजची सुरुवात झालीच म्हणून समजायची. आपले खाणे-पिण्यावर नियंत्रण येणार आहे. हृदयादी विकार, बायपासची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. मुलांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. संतती इच्छुकांना आपल्या मनाप्रमाणे संततीचा लाभ होणार आहे. ज्यांना संतती समस्या आहे व आपणास याबाबत टेस्टट्युब करण्याची इच्छा आहे, त्यांनी हा प्रयोग या वर्षात करावा.

नातीगोती – धनू राशी समस्तांना नवीन वर्षात नातीगोतीच्या मेळाव्याचा आनंद मिळणार आहे. काही नातेवाईक व आपणात काही गैरसमज झालेले होते ते या वर्षात दूर होतील. नातेवाईक व आपणात मनोमिलन होणार आहे. याबाबत सावधान असावे. आपण अविवाहित आहात अथवा आपली मुले-मुली विवाहेच्छुक असल्यास याच नातेसंबंधितांमुळे विवाह ठरतील व आपली इच्छा असल्यास ‘शुभमंगल सावधान’ पण होणार आहेत. त्यासाठी नातेसंबंध टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

आर्थिक – धनू राशीच्या व्यक्ती नोकरी करीत आहात, व्यवसाय करीत आहात, शेतकरी आहात. कुठलेही कार्य आपण करीत असाल तर आपण आपले कार्यात यशस्वी तर होणार आहेतच व या कार्यातून आपणास भरघोस आर्थिक लाभ पण होणार आहे. लॉटरी, तिकीट घेवून नशिब आजमावयास हरकत नाही. पण याचे व्यसन लागणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकांना वास्तु बांधकाम सुरु करता येणार आहेत. शेतकरीवर्गाची मुले शिक्षण क्षेत्रात उत्तुंग असे यश मिळवतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या