धुळे – Dhule – प्रतिनिधी :
धुळे महापालिकेत एक तर एचडीएफसी बँकेत पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी 127 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या दोन हजार 700 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 96 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापुर्वी देखील महापालिका आणि एचडीएफसी बँकेत कोरोना रुग्ण आढळून आले. परंतू आज महापालिका पॉलिटेक्निक सीसीसी येथील अहवालानुसार महापालिकेत एक आणि एचडीएफसी बँकेत पाच रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शिवाजीनगर, मोराणे, दसेरा मैदान, मनोहर टाकीजवळ, बडगुजर प्लॉट, ललित पेट्रोल पंप प्रत्येकी एका रुग्णाचा तर ओमसाई अपार्टमेंट दोन आणि देवपूरात तीन रुग्ण आढळले आहेत.
खाजगी लॅब येथील 15 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पाच कंदील एक, साने गुरुजी सोसायटी, यशवंत नगर, प्लाझा अपार्टमेंट वाडीभोकर रोड, शेलारवाडी, मुकटी, जातोडे, भदाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर मालेगाव रोड तीन, बांबु गल्ली दोन, पिंपळनेर दोन रुग्ण आढळून आले आहेत.
सायंकाळी सात वाजता दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयातील 60 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पिंपळचौक, जयहिंद कॉलनी, डालडा घरकुल, तहसीलदार ऑफिस समोर, सेंट्रल बँक, माळीवाडा, निमगुळ, मालपूर येथील प्रत्येकी एका रूग्ण आहेत. तर शिंदखेडा येथील 3 रूग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्हा रूग्णालयातील 13 अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिवप्रताप कॉलनी 1, निमगुळ ता. धुळे येथील 2 रूग्ण आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 52 पैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मिलिंद सोसायटी, बडगुजर प्लॉट, सुशील नगर, मनोहर टॉकीज जवळ, गल्ली नं 12 जुने धुळे, नवनाथ नगर, यशवंत नगर, धुळे येथील प्रत्येकी एक रूग्ण आहे. तसेच वेल्हाणे ता. धुळे 1, गोपाळ नगर, पिंपळनेर 1 व धुळ्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 700 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 96 जणांचा बळी गेला आहे.