Tuesday, April 29, 2025
Homeधुळेजिल्ह्यात आणखी 171 पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आणखी 171 पॉझिटिव्ह रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाने कहरच केला असून गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरावर रूग्ण आढळून येत आहेत. शनिवारी देखील 171 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर धुळे शहरातील एैंशी फुटी रोडवरील 60 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 141 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 4 हजार 220 एवढी झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील 100 अहवालांपैकी 45 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात मोहाडी 3, नकाने रोड 3, भोई सोसायटी 1, देविदास कॉलनी 1, सुभाष नगर 2, चंपाबाग 2, अनकवाडी 1, चितोड रोड 1, स्टेशन रोड 1, बोरिस 1, रासकर नगर 1, चाळीसगाव रोड 2, वलवाडी 2, नवलनगर 1, जुनवणे 2, मित्रकुंज सोसायटी 1, नेर 1, धुळे इतर 1, फागणे 2, देऊर 1, अवधान 1, कैलाश नगर 2, कुसुंबा 3, गुरुदत्त कॉलनी 1, चितोड नाका 1, कौठळ 3, उसगल्ली 3, काळखेडा येथील एकाचा समावेश आहे.

भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 14 अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात सीसीसी भदाणे 8, व छत्रपती नगर साक्रीतील 5 रूग्ण आहेत.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 91 अहवालांपैकी 37 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शहादा रोड दोंडाईचा 1, मालपूर 4, पार्श्वनाथ नगर 2, रावळ नगर 1, महादेवपुरा 3, इंदावे 1, माळीच 1, धमाणे 4, भदाणे 1, मुन्ना चौक 1, ठाकूर गल्ली 1, भोई वाडा 1, पंचवटी चौक 1, विरदेल 2, डीजेनगर 1, आरावे 1, बी.के.नगर 1, अशोक नगर 1, सुलवाडे 5 व शिंदखेडा येथील पाच रूग्ण आहेत.

महापालिका पॉलिकेक्निक सीसीसीमधील 94 अहवालांपैकी 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात जुने धुळे 4, साक्री रोड 9, चितोड रोड 1, महावीर नगर 2, सुभाष नगर 1, भोई सोसायटी 1, संभाजी नगर 1, रेऊ नगर 2, वाडीभोकर 1, रेल्वे स्टेशन रोड 1, शिरपूर बस स्टँड जवळ 1, शिवपार्वतीनगरातील दोन रूग्णांचा समावेश आहे. 2.

खाजगी लॅबमधील 69 अहवालापैकी 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात केले नगर 2, संत गाडगे बाबा कॉलनी 2, सुभाष नगर 2, पाडवी सोसाईटी साक्री रोड 1, गोळीबार टेकड़ी 1, गल्ली नं 4 1, सैनिक कॉलनी 1, विद्यानगरी 1, तिरुपती नगर 1, ़झुलेलाल सोसायटी 1, महिंदळे 1, भाईजी नगर 1, गोंदुर 1, कापडणे 1, कौठळ न्याहळोद 1, बोरिस 4, कासारे साक्री 1, धुळे 1, मुकटीतील एक रूग्ण आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 38 अहवालांपैकी 24 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शासकीय महाविद्यालय 2, सैय्यद नगर 1, साक्री रोड 1, वाघाडी 1, दोंडाईचा 1, धुळे इतर 5, मोहाडी 1, शिरपूर 2, बोरिस 1, चितोड 1, देवपूर 1, मनमाड जीन 1, शिंदखेडा 1, कुसुंबा 1, ग. नं. चार 1, तरवाडे 1, म्हाडा कॉलनीतील दोन रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 4 हजार 220 वर पोहोचली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : Vaibhav Suryavanshi ची वादळी शतकीय खेळी; दिग्गजांकडून...

0
मुंबई | Mumbai  आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफान फटकेबाजीने हवा केली आहे. काल (सोमवारी) जयपूर येथे राजस्थान रॉयल्स...