Monday, April 28, 2025
Homeधुळे200 बेड ऑक्सिजनसह तयार ठेवण्याचे आदेश

200 बेड ऑक्सिजनसह तयार ठेवण्याचे आदेश

धुळे – Dhule- प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने 90, तर जवाहर मेडिकल फाउंडेशन 100 बेड ऑक्सीजन युक्त सुविधेसह पुढील आठवड्यापर्यंत सुसज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसापासून धुळे शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आज सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयातील विविध कक्षांना भेट देऊन पाहणी केली. अतिदक्षता विभागातील कोरोना बाधित रुग्णांशी पीपीई कीट घालून संवाद साधला.

यावेळी आयुक्त अजिज शेख, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, कोरोनाचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी रुग्णालयातील विविध कक्षांना भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर पीपीई कीट घालून कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी औषधोपचार, भोजन, उपलब्ध सुविधा याविषयी रुग्णांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविले.

रुग्णांना निश्चित वेळेतच भोजन देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासन केल्या. कोरोनाविषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यातर्फे पुरेशा उपायोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणखी 200 ऑक्सिजन सुविधा असलेले बेड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयास भेट देऊन तेथे 100 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करावे, अशा सूचना केल्या. यावेळी डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...