पेठ | प्रतिनिधी | Peth
- Advertisement -
पेठ-नाशिक मार्गावरील (Peth-Nashik Road) अपघातास (accident) निमंत्रण ठरणाऱ्या कोटंबी घाटात (Kotambi Ghat) आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोडेतेलाचा ट्रक उलटल्याची घटना घडली आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, कच्छ भुजवरुन हिमानी कंपनीचे (Himani Company) बेस्ट चॉईस रिफाईन पामोलीन तेलाचे २१ टन १५ किलोचे डबे व १ लिटरचे पाऊच घेऊन नाशिककडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जी.जे. १२ एटी ८६३९ ने वेगावरील नियंत्रण गमावल्याने कठड्यास घासून लगतच्या दरीत कोसळला. यावेळी ट्रक कोसळताच डबे फुटुन खड्यात तेलाचे तळे साचले.
दरम्यान, वाहून जाणारे तेल व गळके डबे परिसरातील ग्रामस्थ घेऊन गेले. तसेच सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.