नाशिक । प्रतिनिधी
मालेगावमध्ये घरोघरी नागरिकांची तपासणी सुरु असून गुरुवारी आणखी पाच नवे करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
बुधवारी पाच करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यामुळे एकटया मालेगावमधील करोना बाधित रुग्णाची संख्या दहावर गेली आहे. तर जिल्हाची संख्या १२ वर पोहचली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण चांदवड तालुक्यातील असल्याचे समजते.
नाशिकमध्ये आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. –
मालेगाव मध्ये एकूण ९ रुग्णांवर उपचार सुरू तर नाशिक शहरात दोघांवर उपचार सुरू आहेत.
मालेगांव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोना संशयीत ५ रूग्णांचे अहवाल कोरोना बाधीत आले आहेत.त्यापैकी ४ मालेगांव शहरातील व १ चांदवड येथील आहे. त्यामुळे मालेगांव शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ९ झाली आहे.मालेगांव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्या बाधीत रूग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध घेऊन त्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत.
(डॉ सुरेश जगदाळे जिल्हा शल्यचिकिसक नाशिक तथा कोरोना जिल्हा नोडल अधिकारी)