Saturday, July 27, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश

नेवासा | तालुका प्रतिनिधि

भंडारदरा, निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. या‌दरम्यान प्रवरानदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर भागचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) अन्वये प्रतिबंधात्मक स्वरूपात जमावबंदी आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळया (बर्गे) काढण्यात येणार आहेत. नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात शेतकरी बर्गे टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसेच सदर प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी नेमलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी मारहाण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश लागलेल्या ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर फिरण्यावर या कालावधीत निर्बंध राहील. या कालावधीत या ठिकाणांच्या आजुबाजूस ५०० मीटर पर्यंतचे परिसरात कार्यकारी अभियंता, अहमदनगर पाटबंधारे विभाग, अहमदनगर अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व वाहने यांना वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही. असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या