बीड । Beed
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) रोज नवे खुलासे पुढे येत आहे. अशातच या प्रकरणातील वाल्मिक कराड (Walmik Karad), सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि प्रतीक घुले (Pratik Ghule) यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आल्याने आवादा कंपनीकडे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे बोललं जात आहे.
तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड याची धनंजय मुंडेंशी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप वारंवार केला जातोय. या प्रकरणाचा मूळ सूत्रधारच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आहेत, असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. अशातच धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य समोर आलंय. धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या समाधीच दर्शन घेतलं. ते 49 व्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाबद्दल त्यांना विचारण्यात आलं. तुरुंगात असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट मिळतेय असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. त्यावर धनंजय मुंडे बोलले. “या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही. मला प्रश्न विचारु नका. मी स्पष्टपणे सांगितलय, जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत, त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना तात्काळ फाशी द्या. कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा. तुम्हाला बातमी, टीआरपी पाहिजे. त्याशिवाय जाहीराती मिळत नाहीत, जाहीरातीला रेट मिळत नाही. पोलिसांकडून योग्य तपास सुरु आहे” असं धनंजय मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी आणि दोन वेळेस एक रूपयाची योजना राज्यात आणली. राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील सरकारने दिले. आठ हजार नऊशे कोटी रूपये शेतकऱ्यांना वाटले. त्यावेळेस शेतकरी अडचणीत येत आणत असताना, मीच पीकविमा आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पीकविम्या शिवाय वेगळ्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय.