Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनअनुपम खेर यांच्या आईसह घरातील आणखी तीन व्यक्तींचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अनुपम खेर यांच्या आईसह घरातील आणखी तीन व्यक्तींचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

हिंदी चित्रटसृष्टीतील दिग्गज कलाकार यांच्या आईचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे व्हिडिओ अपलोड करून दिली आहे.

त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे, ” माझी आई दुल्हारी यांना भूक लागत नव्हती. काही दिवसापासून त्या फक्त झोपून राहत होत्या. डॉक्टरच्या सांगण्यावरून आम्ही रक्ताची तपासणी केली तर त्यात काही आले नाही. नंतर डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्यास सांगितले असता त्या करोना पॉझिटिव्ह आढल्या.

- Advertisement -

मी आणि माझा भाऊ त्यांच्या संपर्कात असल्याने आम्ही पण टेस्ट करून घेतल्या असता माझ्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याच बरोबर घरातील बाकीच्यांचे टेस्ट केले असता माझ्या वहिनी आणि भाचीचे पॉझिटिव्ह आले आहे. तर माझा भाच्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.”

तसेच त्यांनी म्हंटले आहे, ” आपल्या घरात देखील कोणी वृध्द व्यक्तींना भूक लागत नसेल तर त्यांची देखील आपण टेस्ट करून घ्यावी.” असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी बीएमसीचे आणि डॉक्टरांचे देखील आभार मांडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या