मुंबई | Mumbai
सध्याच्या तंत्रज्ञानाचे युग आहे. यात तंत्रज्ञानाचा वापर करुन काहीही शक्य आहे. विशेषत: AI आल्यापासून गोष्टी अधिकच बिघडत चालल्या आहेत. अलिकडेच सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अशातच आता सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट खूप चर्चेत आहे. अनुपम खेर यांनीच त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत आश्चर्य व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या सोने-चांदी व्यापाऱ्याला फसवणुकीचा सामना करावा लागला. त्याच्याकडून पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. त्या नोतांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता तर बँकेचे नाव RBI होते, पण त्याचा फुलफॉर्म ‘RESOLE BANK OF INDIA’ असा लिहीण्यात आला होता. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या त्या नोटांचा आकार, रंग आणि डिझाईन अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच आहे. अगदी खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नोटांचा हा फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे.
माणेक चौकातील दोन व्यापाऱ्यांकडून २१०० ग्रॅम सोन्याची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेथे तीन लोक उपस्थित होते, त्यापैकी एकाकडे रोख मोजण्याचे मशीन होते. दुसरी व्यक्ती सरदारजींच्या गेटअपमध्ये होती आणि तिसरी व्यक्ती फर्मच्या बाहेर बसली होती. सोने खरेदी करणाऱ्या दोघांनी सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून १.३० कोटी रुपयांच्या नोटा ठेवल्या आणि सोने देण्यास सांगितले. उर्वरित ३० लाख रुपये दुसऱ्या कार्यालयातून आणले जातील, असे सांगितले. मात्र सोने दिल्यानंतर मेहुलच्या कर्मचाऱ्यांनी नोटा चेक केल्या असता त्या बनावट असल्याचे आढळले.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्या नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता आणि RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी ‘RESOLE BANK OF INDIA’ असे लिहिले होते.
अनुपम खेर यांनी काय म्हंटले?
५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आलं आहे. ज्याचा व्हिडिओ खुद्द अनुपम खेर यांनी स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करून आश्चर्य व्यक्त केले आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, “आता बोला. ५०० रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? खरेच काहीही होऊ शकते”. या धक्कादायक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नोटांचा आकार, रंग आणि डिझाईन अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच आहे. त्या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिझोल बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. या बनावट नोटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर या नोटा कशा बनवल्या आणि त्यामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. बनावट नोटा कोठून छापल्या जात आहेत आणि अशा किती बनावट नोटा चलनात आल्या आहेत, हे शोधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. जर तुमच्या हातीही अशी नोट आली थोडी सावधगिरी बाळगा.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा