Tuesday, July 16, 2024
HomeनगरAPMC Election 2023 : राहुरीमध्ये मतदानावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; मतदार, उमेदवार अन्...

APMC Election 2023 : राहुरीमध्ये मतदानावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; मतदार, उमेदवार अन् निवडणूक यंत्रणेची उडाली धांदल

राहुरी | प्रतिनिधी

- Advertisement -

करोना काळामुळे दोन वर्षे उशिराने होत असलेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे.

जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज (दि.28) सात बाजार समित्यांसाठी मतदान होऊन उद्या (29) मतमोजणी होणार आहे. आज मतदान होणार्‍यांमध्ये संगमनेर, राहुरी, नगर, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी आणि कर्जत या बाजार समित्यांचा समावेश आहे.

दरम्यान, राहुरी बाजार समितीच्या मतदानाच्या वेळी अचानक वादळी पाऊस आल्याने मतदारांसह उमेदवार आणि निवडणूक यंत्रणेची चांगलीच धांदल उडाली. मतदार विशेषतः महिला मतदार, उमेदवार, अधिकाऱ्यांना अक्षरशः मतदान व मतमोजणीपूर्वीच मतमोजणी केंद्राचा आधार घ्यावा लागला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.

नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्…. पाहा VIDEO

आज सकाळी हा प्रकार राहुरी कॉलेज मतदान केंद्रावर पहावयास मिळाला. मतदान प्रक्रिया नियोजन करताना निवडणूक अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक पाऊस येऊ शकतो. हे लक्षात घेऊन खबरदारी घेणे आवश्यक होते, असे प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केली .

जिया खान आत्महत्या प्रकरण: विशेष CBI कोर्टाने दिला मोठा निकाल; सूरज पांचोलीची…

निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना या वादळी वाऱ्यामुळे मतमोजणी केंद्र अर्थात राहुरी कॉलेजच्या जिमखाना शेडमध्ये आधार घ्यावा लागला. यावेळी उपस्थित पोलीस यंत्रणा आणि पत्रकारांची देखील धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले .

Hapus Mango : अस्सल ‘हापूस’ आंबा नेमका ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

- Advertisment -

ताज्या बातम्या