Friday, May 16, 2025
HomeनगरAPMC Election Result : कर्जत बाजार समितीत 'काटे की टक्कर', रोहित पवार-राम...

APMC Election Result : कर्जत बाजार समितीत ‘काटे की टक्कर’, रोहित पवार-राम शिंदेंना बरोबरीत जागा

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दोन्ही गटात काटे की टक्कर दिसून आली. दोन्ही गटाला बहुमत मिळालेले नाही. राम शिंदे गटाला व रोहित पवार गटाला प्रत्येक नऊ अशा समान जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दोन जागांसाठी फेर मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.संगमनेर बाजार समितीवर थोरात यांचे वर्चस्व सिद्ध… 18 पैकी 18 जागा जिंकून महाविकास आघाडीचा विजय.. भाजपचे विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही.. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवला विजय..पारनेर मध्ये १८ पैकी १५ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे या बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. तीन जागांची मतमोजणी सुरू असून, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.श्रीगोंदा बाजार समिती : माजी आमदार राहुल जगताप यांचा पॅनल बहुमताकडेनगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आलेली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत अठरा जागांपैकी बारा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. उर्वरित सहा जागांवर मतमोजणी सुरू आहे.पाथर्डी बाजार समिती निवडणुकीचा निकाल हाती… 18 पैकी नऊ जागांचा निकाल आहे… 18 पैकी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या गटाला 9 जागा तर पाथर्डी बाजार समितीत मोनिका राजळींच वर्चस्व दिसून येत आहे.श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप गटाला आतापर्यंत पाच जागा… काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे-भाजपचे आमदार बबनराव पाचपुते गटाचे खातेही उघडले नाही.नगर बाजार समिती : सेवा संस्था सर्वसाधारणच्या ७ पैकी ७ जागावर भाजप विजयीसंगमनेर कृषी बाजार समिती : विखे-थोरातांच्या लढतीत अपक्षाची बाजी… हमाल मापाडी संघात अपक्ष उमेदवार सचिन कर्पे विजयी.
ताज्या अपडेट्ससाठी ही लिंक रिफ्रेश करा…
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल… आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी गटाला आतापर्यंत सात जागा…. खासदार सुजय विखे गटाने खातेही उघडले नाही. कर्जतमध्ये आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात गटात अटीतटीची लढत… एक जागा भाजपला, दोन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीलानगर बाजार समिती : ग्रामपंचायत २ जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित… ग्रामपंचायत २ जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चितसंगमनेर कृषी बाजार समितीत पहिल्या फेरीत कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या पॅनलची आघाडी… 18 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर, 4 ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या
नगर बाजार समिती : हमाल मापाडी मधून भाजपचे निलेश सातपुते मोठ्या फरकाने आघाडीवरजिल्ह्यातील सात बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात नगर जिल्ह्यातील संगमनेर, नगर, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी आणि कर्जतच्या समित्यांचा समावेश होता. आज या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. तर शेवगाव आणि जामखेडच्या बाजार समितीसाठी रविवारी मतदान होत आहे. काल झालेल्या मतदानादरम्यान नगर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान झाले.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...