दिल्ली | Delhi
करोनाने जागतिक पातळीवर थैमान घातले आहे. कोरना नियंत्रण अद्याप कोणत्याही देशात झालेले नाही. दरम्यान, करोनाविरूद्ध लसीकरण मोहीम लवकरच भारतात सुरू केली जात आहे. भारतात करोनाच्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून एक पत्र पाठवण्यात आले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेत कोणताही खंड पडू न देता ब्राझीलमधील राष्ट्रीस लसीकरणाचा प्रारंभ करण्यासाठी करोना लसीचे २० लाख डोस पाठवण्यात यावेत, अशी मी विनंती करतो, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ब्राझील सरकार द्वारा संचालित फियोक्रूझ बायोमेडिकल सेंटरने एस्ट्राजेनेका नामक लसीचे लाखो डोस या महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सांगितले. ब्राझीलमध्ये तातडीने कोणतीही लस उपलब्ध होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडून लस मिळण्याबाबत पत्र पाठवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतातून येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती फ्रियोक्रूझकडून ब्राझील सरकारला करण्यात आली आहे. लस उपलब्ध नसल्याने अन्य देशांच्या तुलनेत ब्राझीलमध्ये लसीकरण कार्यक्रम मागे पडला आहे. त्यामुळेच भारताकडून लस मिळण्याची प्रतिक्षा ब्राझीलचे सरकार करत आहे. भारतामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सुरूवातीला हे लसीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. सरकारकडून मोफत लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे.