Friday, November 22, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील 'इतक्या' तलाठ्यांना आज नियुक्तीपत्राचे होणार वाटप

जिल्ह्यातील ‘इतक्या’ तलाठ्यांना आज नियुक्तीपत्राचे होणार वाटप

नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राबाहेरील गावांसाठी २८ तलाठ्यांना शुक्रवारी (दि. २७) नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या तलाठ्यांना पुढील दोन महिने वरिष्ठ तलाठ्यांसोबत प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. यानंतर त्यांच्याकडे गावाचा स्वतंत्र कारभार सोपवण्यात येईल. जिल्ह्यातील रिक्त १७३ तलाठी पदे भरण्यासाठी २०२२- २३ मध्ये शासनाने मंजुरी दिली. शासन स्तरावरुन राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यत १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत लेखी परीक्षा पार पडली.

दरम्यानच्या काळात समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने एकूण १७३ पदांपैकी पेक्षा क्षेत्रातील ७६ जागांच्या भरतीला स्थगिती दिली. बिगर आदिवासी (सर्वसाधारण) क्षेत्रातील ९६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यातील २७ उमेदवार कागदपत्र तपासणीसाठी हजर झाले नाहीत. त्यांना एक महिन्याची संधी देवून रिक्त जागांसह अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ५० जागांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

- Advertisement -

त्यातही दहा उमेदवार गैरहजर राहिले. उर्वरित ४० व्यक्तींपैकी सर्वसाधारण प्रवर्गातील २८ व्यक्तींना शुक्रवारी नियुक्तीपत्र मिळणार आहे. उर्वरित व्यक्तींनी आरक्षण कोट्यातून असल्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी संबंधित विभागाकडून केली जात आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्त्तीपत्र मिळेल. नियुक्ती झालेल्या उमेदवारांमध्ये येवला, मालेगाव, चांदवड, बागलाण, नाशिक व इगतपुरी या उपविभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

समांतर आरक्षण
पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत ६७ व्यक्ती प्रतीक्षा यादीत होते. त्यात समांतर आरक्षणाचे २१ उमेदवारांचा अहवाल येणे बाकी आहे. याच पध्दतीने आताही समांतर आरक्षण, माजी सैनिक पाल्य, दिव्यांग प्रमाणपत्र आदींची चौकशी होणे बाकी असल्याने त्यांना कालांतराने नियुक्ती देण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या