Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा आयुक्तपदी डॉ.ए.एन.करंजकर यांची नियुक्ती

नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ.ए.एन.करंजकर यांची नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाने राज्यातील 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून नाशिक महानगर पालिकेच्या रिक्त असलेल्या मनपा आयुक्त पदावर डॉ ए. एन करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची शिक्षण मंडळ आयुक्त पदी बदली झाल्यानंतर गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून हे पद रिक्त होते. या नव्या नियुक्त्यांमध्ये राज्य शासनाने नाशिक मनपा आयुक्त पदाची जबाबदारी डॉ ए. एन करंजकर त्यांच्यावर सोपवली आहे आहे.डॉ.करंजकर हे मुंबई च्या ईएसआयएसचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या