नाशिक रोड । प्रतिनिधी | Nashik Road
विद्युत सहाय्यकपदाच्या (Electrical Asst) भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणने (MSEDCL) मागील आठ दिवसांत अविश्रांत परिश्रम घेत राज्यभरातील एक हजार 13 विद्युत सहाय्यकांना राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमात नियुक्तीपत्रे (Appointment letters) दिली.
यामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील (Nashik Collectorate Office) नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरणच्या नाशिक (nashik) आणि जळगाव (jalgaon) परिमंडलातील 179 विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
मुंबई (mumbai) येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात झालेल्या महासंकल्प कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांंच्या हस्ते महावितरणच्या (MSEDCL) विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे देऊन या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये 75 हजार रोजगार (Employment) देण्याचा संकल्प राज्य शासनातर्फे (state government) राबवण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आयोजित ‘महासंकल्प’ या कार्यक्रमात उर्वरित सर्व विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे आज देण्यात आली. उमेदवारांना विद्युत सहाय्यक पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. महावितरणच्या विभागीय स्तरावर या विद्युत पदस्थापना करण्यात आली असून त्यांना तांत्रिक कामाचे प्रशिक्षणही देण्यात येईल.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (मासं/प्रकल्प) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकार्यांनी मागील आठ दिवस अविश्रांत प्रयत्न करत जास्तीत जास्त विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
महावितरणने परिमंडल-स्तरापर्यंत विद्युत सहाय्यक या पदाच्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यावे, असे आवाहन करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांना सहकार्य करत राज्य शासनाचा ‘महासंकल्प’ हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात महावितरणने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
पात्र ठरलेले उमेदवार
अकोला परिमंडल – अमरावती परिमंडल – 38, औरंगाबाद परिमंडल- 62, बारामती परिमंडल- 143, भांडूप परिमंडल – 83, चंद्रपूर परिमंडल – 22, गोंदिया परिमंडल- 9, जळगाव परिमंडल – 103, कोल्हापूर परिमंडल- 104, कल्याण परिमंडल – 78, लातूर परिमंडल – 70, नागपूर परिमंडल – 37, नांदेड परिमंडल – 39, नाशिक परिमंडल – 76, पुणे – 60 आणि रत्नागिरी परिमंडल- 32 अशा एकूण 1 हजार 13