Thursday, March 27, 2025
HomeमनोरंजनNSD चे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांची नियुक्ती

NSD चे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांची नियुक्ती

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध अभिनेते आणि गुजरातमधील भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National School of Drama) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परेश रावल यांची नेमणूक केली.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनी केले अभिनंदन

केंद्रीय मंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनीही परेश रावल यांच्या निवडीबद्दल म्हंटले आहे की, “प्रख्यात कलाकार परेश रावलजी यांची महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी एनएसडी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या कलागुणांचा फायदा देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना होईल. हार्दिक अभिनंदन.”

त्यांच्या सक्षम नेतृत्वात एनएसडी नक्कीच नवीन उंचावर जाईल – संस्कृती मंत्रालय

संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करत म्हटलं की, “प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. त्यांच्या सक्षम नेतृत्वात एनएसडी नक्कीच नवीन उंचावर जाईल.”

NSDने देखील रीट्वीट करत परेश रावल यांचे स्वागत केले आहे. NSD ने म्हंटले आहे की, “आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रख्यात अभिनेते आणि पद्मश्री परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कुटुंब त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : तडजोडीसाठी फायली अडवल्यास, लाचलुचपतकडे तक्रार करेल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी नियमानुसार परवानग्या द्याव्यात. आयुक्त हे महापालिकेचे प्रमुख असल्याने त्यांचीही ही जबाबदारी आहे. यात त्यांनी स्वतः लक्ष घालावे....