Saturday, July 27, 2024
Homeजळगावगुप्तधनासाठी पुजा करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

गुप्तधनासाठी पुजा करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील नादगरोड भागात एका शेतातील पत्राच्या शेडमध्ये गोलाकार बसुन, त्यामध्ये मानवी खोपडी ,लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर, आगरबत्ती पुडा, लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्त धना करीता आघेरी कृत्य करुन जादुटोणा करणार्‍या ९ जणांच्या टोळीच्या गुप्तधन काढण्यापूर्वीच चाळीसगाव पोलिसांनी तांब्यात घेतले. याप्ररकणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. वेळीच अघोरी कृत्य करणार्‍या जेरबंद केल्यामुळे चाळीसगाव पोलिसांचे कौतूक होत आहे.

- Advertisement -

दि.१५ रोजी चे २३/०० ते दि.१६ रोजी सकाळी ०५ वा दरम्यान वरिष्ठाच्या आदेशाने चाळीसगाव पोलिसांकडून चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत आषाढ आमावस्या निमित्त सक्त रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असतांना पोकॉ पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांना गोपनीय माहीती मिळाली की, दि.१६ रोजी आषाढ आमावस्या असल्याने सकाळी प्रहरीचे सुमारास चाळीसगाव शहरातील नागद रोड लगत नायरा पेट्रोलपंप समोरील शेतातील पडीत घरात काही इसम गोलाकार स्थितीत खाली बसुन त्यामधे मानवी खोपडी व इतर पुजेच्या साहीत्यासह आघोरी पुजा करणेकरीता एकत्रित जमणार आहेत. याबाबत माहीती मिळाल्याने सदरची माहीती पोलीस निरीक्षक संदिप पाटील, सपोनि विशाल टकले, सपोनि सागर ढिकले यांना कळवुन बातमीची खात्री करणेकामी पो. स्टे. नेमणुकीचे पोना राहूल सोनवणे, महेंद्र पाटील, रविंद्र बच्छे, समाधान पाटील , विजय पाटील , राकेश महाजन, आशुतोष सोनवणे,चालक नितीन वाल्हे व गणेश नेटके, पोकॉभरत गोराळकर असे पंचांसह मिळालेल्या माहीतीच्या दिशेने रवाना झाले. मिळालेल्या बातमीच्या अलिकडे शासकिय वाहन लावुन बातमीची खात्री करीता नायरा पेट्रोलपंपासमोरील शेतातील पडीत घरात खात्री करता तेथे काही इसम खाली बसुन पुजा करतांना दिसले. पोलीसांची व पंचांची खात्री होताच छापा टाकुन खाली बसलेल्या इसमांना जागीच पकडुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी लक्ष्मण शामराव जाधव (वय- ४५), शेख सलीम कुतुबुददीन शेख वय (५६) दोघेे रा.चाळीसगाव, अरूण कृष्णा जाधव वय ४२ वर्ष रा.आसरबारी ता.पेठ जि.नाशिक, विजय चिंतामन बागुल वय ३२ वर्ष रा. जेल रोड नाशिक, राहुल गोपाल याज्ञीक वय २६ वर्ष रा. ननाशी ता.दिंडोरी जि.नाशिक, अंकुश तुळशीदास गवळी वय २१ वर्ष रा. जोरपाडा ता. दिंडोरी जि.नाशिक, संतोष नामदेव वाघचौरे वय ४२ वर्ष रा.अशोकनगर नाशिक, कमलाकर नामदेव उशीरे वय ४७ वर्ष रा.गणेशपुर पिंप्री ता.चाळीसगाव जि.जळगाव, संतोष अर्जुन बाविस्कर वय ३८ वर्ष रा.अंतुर्ली (कासोदा) ता.एरंडोल जि.जळगाव असे सांगितले व सदर ठिकाणी वरील नमुद इसम हे गोलाकार स्थीतीत खाली बसुन त्यामध्ये मानवी खोपडी ,लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग,पत्रावरील छापील देव, कंदमुळे,गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर,आगरबत्ती पुडा,लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्त धना करीता आघेरी कृत्य करुन जादुटोणा करीत असतांना मिळुन आले. त्यांचे ताब्यात अघोरी पुजा करीत असतांना एकुण ८३५,१०० रु. किंमतीचा साहीत्य (आरोपीतांचे मोबाईल फोन, एक टोयोटा युनोव्हा कार क्रमांक ७५५७, व इतर अघोरी पुजा करण्याचे साहीत्य.) मिळुन आले आहे. सदर आरोपीतांविरुध्द पोकॉ पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. ३४२/२०२३, महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष , अनिष्ठ व आघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटण करणे बाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) व ३(३) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/सागर ढिकले व पोकॉ/४३५ प्रकाश पाटील हे करीत आहेत.

—–अघोरी विद्याच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे, चमत्काराचा प्रयोग प्रसारीत करणे व आर्थिक फसवणुक करणे, नरबळी देणे, अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे, पैशाचा पाउस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे, अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन लोकांमध्ये दहशत करणे, मंत्रांच्या सहाय्याने भुत पिसाच्य दुर करण्याबाबत शक्ती असल्याचे भासवुन उपचार करणे, मानसिक विकलांग व्यक्तींमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवुन त्यादवारे इतरांची फसवणुक करणे, अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या इसमांबाबत माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीसांना माहीती कळवावी जेणेकरुन अशा गुन्ह्यातील आरोपीतांना कायमचा पायबंद घालणेकामी वेळीच मदत होईल.

संदिप पाटील, पोलीस निरिक्षक, चाळीसगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या