Saturday, May 4, 2024
Homeनाशिकउद्योगांच्या वीजदराबाबत लवकरच योग्य निर्णय: उद्योगमंत्री

उद्योगांच्या वीजदराबाबत लवकरच योग्य निर्णय: उद्योगमंत्री

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यामध्ये नवीन उद्योग येऊ पाहत आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन (state government) प्रयत्न करीत आहे.

- Advertisement -

लवकरच वीज (electricity) दरवाढीसंदर्भामध्ये ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (State Industries Minister Uday Samant) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या (Ambad Industries And Manufacturing Association) वतीने आयमा सभागृहात बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी उद्योगमंत्री सामंत नाशिकमध्ये (nashik) आले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी सांगितले की, संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) हे प्रथम स्थानावरती उद्योग निर्मितीसाठी आणि नवीन उद्योग येणारे राज्य ठरले आहे. नुकताच जो पाहणी अहवाल आला, त्यात हे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज दरात असलेली तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या