नाशिक । प्रतिनिधी Nashik
महापालिकेचे शहरात चार तरण तलाव (NMC’s Swimming Bridge )असून या ठिकाणी आउटसोर्सिंद्वारे आठ जीव रक्षक नेमणुकीला महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
दोन वर्षांसाठी जीवरक्षक नेमले जाणार असून त्यांचे वेतन व भत्ते यासाठी 47 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. महापालिकेचा नाशिकरोडला राजमाता जिजाऊ आंतराष्ट्रीय जलतरण तलाव, पश्चिममध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नवीन नाशकात स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व सातपूर जलतरण तलाव आहे. या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र पूल आहेत.
या ठिकाणी विद्यार्थी, पुरुष व महिला पोहणे शिकण्यासाठी येतात. सध्या उन्हाळा सुरु झाल्याने सभासद व शिकाऊंची गर्दी वाढली आहे. मात्र, सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी कर्मचारी व जीवरक्षकांची संख्या अपुरी आहे. ते पाहता पोहताना काही दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. तरण तलावांसाठी 15 जीवरक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीत आठ पदे रिक्त आहेत.
सातपूरचा तरणतलाव बंदच
सातपूरला महिलांसाठी स्वतंत्र तरणतलाव बांधण्यात आला. मनुष्यबळाअभावी तलाव उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बंदच राहिलेला आहे. या तलावाचे बांधकाम बूर्ण होऊन वर्षभर उलटले असतानाही वापराअभावी पडून आहे. त्यालाही या मनुष्यबळाच्या उपलब्धतेने जीवदान मिळेल, असा विश्वास जलतरणपटू महिलांनी व्यक्त केला.