Saturday, July 27, 2024
Homeनाशिकलासलगांव बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी जागा मंजुर

लासलगांव बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी जागा मंजुर

लासलगांव | Lasalgoan

येथील बाजारसमितीस (Lasalgoan Bajar Samiti) खडक माळेगांव / खानगांव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीने परीसरातील शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांच्या सोई व सुविधेच्या दृष्टीने मौजे खानगांव (Khangoan) नजिक शिवारातील मोकळी जागा नियोजित उपबाजार आवाराकरीता शासकीय दराने उपलब्ध करून देणेसाठी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीचे मासिक सभेत ठराव संमत करून सदर ठरावाची प्रत बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप (Speaker Suvarna Jagtap) यांचेकडे सुपूर्द केली.आहे

- Advertisement -

खडक माळेगांव / खानगांव (नजिक) व परीसरातील शेतकरी बांधवांच्या मागणीवरून लासलगांव बाजार समितीने सन 2009 मध्ये मौजे खानगांव (नजिक) येथे तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र सुरू करून त्या ठिकाणी सुरूवातीस द्राक्षेमणी ह्या शेतीमालाचे तर माहे सप्टेंबर, 2020 पासुन भाजीपाला ह्या शेतीमालाचे लिलाव सुरू केले आहे.

सदरच्या दोन्ही लिलावास परीसरातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडुन मौजे खानगांव (नजिक) येथे लासलगांव बाजार समितीचे कायमस्वरूपी उपबाजार आवार सुरू करावे अशी मागणी होत आहे.

परंतु बाजार समितीस सदर ठिकाणी स्वमालकीची जागा नसल्याने उपबाजार आवारासाठी लागणा-या मुलभूत सोई व सुविधा उपलब्ध करून देणेस अडचण येत होती. त्याअनुषंगाने बाजार समितीने खडक माळेगांव / खानगांव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीकडे नियोजित खानगांव (नजिक) – खडक माळेगांव उपबाजार आवारासाठी 5.00 हेक्टर जागा शासकीय दराने उपलब्ध करून देणेकरीता मागणी केली होती.

त्यानुसार खडक माळेगांव व खानगांव (नजिक) ग्रामस्थांनी परीसरातील शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांच्या सोई व सुविधेच्या दृष्टीने तसेच खानगांव (नजिक) परीसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नुकतीच सभा घेऊन मौजे खानगांव (नजिक) शिवारातील गट नं. 02 मधील जागेपैकी 03 हेक्टर 50 आर जागा लासलगांव बाजार समितीच्या नियोजित खानगांव (नजिक) – खडक माळेगांव उपबाजार आवारासाठी शासकीय दराने उपलब्ध करून देणेस संमती दिल्यानंतर यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव संमत करून सदर ठरावाची प्रत आज ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी बाजार समितीच्या सभापती स सुवर्णा जगताप सचिव नरेंद्र वाढवणे यांचेकडे सुपूर्द केली.

सदरची जागा उपबाजार आवारासाठी उपलब्ध करून देणेसाठी खडक माळेगांव / खानगांव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सोनाली संदीप गारे यांनी सभेत सुचना मांडल्यानंतर त्यास कविता बापु गारे यांनी अनुमोदन देऊन सदर विषयावर सभेत सविस्तर चर्चा व विचारविनिमय झाल्यानंतर गांवविकासाच्या दृष्टीने व परीसरातील शेतकरी बांधवांची जवळपास मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीस जागा देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती सरपंच तेजल रायते यांनी दिली.

याप्रसंगी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी खडक माळेगांव / खानगांव (नजिक) ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांसह ग्रामस्थांचे तमाम शेतकरी बांधव व बाजार समितीच्या वतीने आभार व्यक्त करून जागा संपादनाची प्रक्रिया पुर्ण होताच त्याठिकाणी उपबाजार आवारासाठी सर्व सोई व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या