Saturday, June 15, 2024
Homeनाशिकआदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षमताचाचणी

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षमताचाचणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी गतवर्षी राबविण्यात आलेला क्षमता चाचणीचा उपक्रम राबवण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणार्‍या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजीची क्षमता चाचणी घेण्यात येईल.मंगळवारी दि.29 ऑगस्टला ही चाचणी राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. चार विभागांतील 2 लाख 76 हजार 713 विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर ही चार अपर आयुक्त कार्यालये आणि 30 प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत 499 शासकीय आणि 546 अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने शासकीय विविध उपक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी समजून घेण्यासाठी व त्यावरील उपचारात्मक अध्ययन यासाठी आदिवासी विकास विभाग सर्व आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणार्‍या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजी विषयाची क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.29) ही चाचणी महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सर्व ठिकाणी प्रश्नपत्रिका सारखीच असणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातही एक क्षमता चाचणी घेण्यात आली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तीन क्षमता चाचण्या घेण्याचे नियोजन आहे. यातील येणार्‍या निकालाआधारे विद्याथ्र्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणास मदत

विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीमुळे कोणता विद्यार्थी नेमका कुठे मागे पडतोय हे समजण्यास मदत होईल. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मागे पडलेल्या अध्ययनक्षमतेवर काम करणे शिक्षकांना सोपे होईल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासही मदत होईल.

नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास

- Advertisment -

ताज्या बातम्या