Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनवरात्रोत्सवासाठी लावलेली कमान कोसळली; तीन जण जखमी

नवरात्रोत्सवासाठी लावलेली कमान कोसळली; तीन जण जखमी

फलकबाजीचा अतिरेक ठरला घातक

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात राजकीय फलकबाजी व कमानींची लगबग सुरू आहे. त्यातच आज ,बुधवारी (ता.२४) दुपारी मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल सिग्नलजवळ उभारलेली एक कमान कोसळली. या घटनेत तीन नागरिक जखमी झाल्याची प्रत्यक्षदर्शी‍ं कडून माहिती मिळाली असून, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदर कमान ही प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांच्या नावाने उभारण्यात आली होती. मात्र, संपर्क साधल्यावर बोडके यांनी “कमान ही हायमास्ट पोलावर कलली होती, कोणीही जखमी झालेले नाही. कमान उतरवून घेण्यात आली आहे,” असे स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

संपूर्ण शहरात सध्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांच्या वतीने चौक-चौकात आकर्षक कमानी व फलक लावले गेले आहेत. यामधून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

YouTube video player

मात्र, अशा कमानी उभारणीदरम्यान आवश्यक ती सुरक्षितता पाळली जात नसल्याचे ड्रीम कॅसल येथील अपघातातून स्पष्ट झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांच्या सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.याविषयीं मनपा प्रशासनाकडून गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षी मुंबईतील घाटकोपर भागात कमान कोसळून सोळा जणांचा मृत्यू तर ७५ हून अधिक जण जखली झाले होते. नाशिक शहरातील कमानी व फलकांचे ऑडिट झाले होते. मात्र , विविध सण उत्सवा वेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक हे फलकबाजी करत असतात. विविध भागात कमानी उभारल्या जात आहेत. सदर कमानी उभारताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष मखलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल जवळील कोसळलेल्या कमानीने दिसून आले आहे.

प्रश्न उपस्थित होतात..?

एवढी भव्य (जाड) कमान लावण्याची परवानगी नेमकी कोणी दिली?
कोणत्याही परवानगीशिवाय ही कमान उभारलीच कशी?
या घटनेत जीवितहानी टळली असली तरी निरपराध नागरिक जखमी झाले, त्याची जबाबदारी कोणाची?
परवानगीशिवाय उभारलेल्या कमानीवर कारवाई का झाली नाही?
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना करणार?

पंचवटी तल्या अनधिकृत कमानी तसेंच बॅनर काढणार आहे. परवानगी न घेता लावलेल्या कमानी तसेंच बॅनर काढण्याचे काम चालू आहे. ज्या मंडळाची ही कमान होती त्यांना नोटीस देऊन कारवाई करणार आहे.
तुषार देशमुख,सहाय्यक अधीक्षक, पंचवटी विभाग, मनपा

ताज्या बातम्या

Baramati Politics : बारामतीत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये...

0
बारामती । Baramati राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या...