Tuesday, May 28, 2024
Homeजळगाववाळु चोरट्याकडून तलाठ्यास अरेरावी

वाळु चोरट्याकडून तलाठ्यास अरेरावी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

धुळे रोडवरील पेट्रोलपंपाजवळ वाळू चोरट्यांनी तलाठ्यास अरेरावी करत, वाळूचे डंपर खाली करुन पळवून नेल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मेहूणबारा रस्त्याने चाळीसगांवकडे येणारे डंपर तलाठी विलास बाबुराव शेळके यांनी अडवून वाळु वाहतुकीचा परवान्याची विचारणा डंपर चालकाकडे केल्यानंतर डंपर चालक गणेश पाटील व त्याच्या सोबत असलेला अन्य एकजण याने तलाठीशी वाद घालत अरेरावीची भाषा करीत वाळूने भरलेले डंपर तेथेच पंपाजवळ रीकामे करुन ‘ तुम्हाला काय करायचे ते करा, असा दम भरुन तेथून डंपर घेवून पळ काढला ’ या प्रकरणी शहर पोलीसांत विलास शेळके तलाठी यांचे तक्रारी वरुन दोघांच्या विरोधात कलम ३५३, २७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गिरणापात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळु चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाळु चोरट्यांवर कडक कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या