Sunday, May 4, 2025
Homeधुळेशिरपुरात वाद, सहा जण जखमी

शिरपुरात वाद, सहा जण जखमी

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शिरपूर (Shirpur) शहरातील मोहम्मदीया चौकात इफ्तारसाठी जमलेल्या गर्दीत वाद उद्भवल्याने त्यातून दंगल उसळली. चाकू, लाकडी दांडा अशी हत्यारे सर्रासपणे वापरण्यात आली. दगडफेकडी केली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी शिरपूर (Shirpur) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातून बाजारात जाणार्‍या रस्त्यावर मोहम्मदिया चौक आहे. तेथील जाकीर अली सैय्यद (वय56) यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे. त्यांचे मोहम्मदिया चौकात खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. रमजान महिना सुरु असल्याने 28 मार्चला सायंकाळी 6 वाजता त्यांच्या दुकानाजवळ गर्दी होती.

गर्दीत काही युवक हम ब्लेड ग्रुपके लडके है, किसीको भी मारंगे असे म्हणत गोंधळ घालत असल्याने जाकीर अली यांनी त्यांना उपास सोडण्याची वेळ असून वातावरण खराब करु नका, अशी विनंती केली. त्यावर संशयित आदिल शेख याने त्याच्या हातात असलेल्या प्लॉस्टरच्या बँडेजमधून चाकू बाहेर काढला व जाकिर अली यांचा मुलगा मुझाहिद सैय्यद याच्या उजव्या बरगडीवर, हातावर वार केला. त्याचवेळी इतरांनीही लाकडी दांड्याने व दगडफेक करुन मारहाण केली.

या घटनेत फराज मसुद शेख, साहिल ऐजाज शाह, मुझाहिद सैय्यद हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येेथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. परंतू मोठा फौजफाटा तैनात केल्यानंतर तणाव निवळला.

यांच्यावर गुन्हा दाखल

जाकिर अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आदिल अल्लाद्दीन शेख, लंगडे का बाबू तथा इम्रान शेख, जादू तथा फैैजान याकूब शेख, यामीन इरफान मिर्झा, जमील बुढा, फरान सैफूद्दीन मुल्ला, रिजवान सैफूद्दीन मुल्ला, दानिश तथा आबा मिर्झा, जुनैद इकबाल मिर्झा, समीर तथा बबलू सईद शेख व त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : येवला शहरात ४ तलवारी जप्त; संशयितास अटक

0
येवला | प्रतिनिधी | Yeola शहरातील पिंजारगल्ली (Pinjar Galli) भागातील एका घरातून ४ तलवारी (Swords) पोलिसांनी (Police) जप्त केल्या असून संशयितास अटक केली आहे. शहर...