Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

आपापसातच भांडणाची चर्चा

- Advertisement -

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

YouTube video player

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या पार्टीत चखण्याचाच मुद्दा ऐरणीवर आला असून, “चखण्याला फक्त चनाकोलीवाडा लवकर मिळेल, चिकन मात्र उशिरा मिळणार” असे सांगण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उमेदवाराने आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसाठी निवडणूकपूर्व भेटीगाठी आणि संवाद वाढावा या उद्देशाने खासगी स्वरूपात मेजवानीचे आयोजन केले होते. सुरुवातीला वातावरण उत्साही होते. मात्र, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर चखण्याबाबत करण्यात आलेल्या घोषणेमुळे काही कार्यकर्त्यांचा मूड बदलला. अनेकांना अपेक्षा होती की चनाकोलीवाड्यासोबत चिकनही लगेच उपलब्ध होईल. परंतु वेटर कडून “आधी चनाकोलीवाडा दिला जाईल, चिकन बनायला उशीर होईल” असे सांगण्यात आल्याने कुजबुज सुरू झाली.

काही कार्यकर्त्यांनी यावर उघड नाराजी व्यक्त करत “नेहमीचे लोक आधी, बाकीचे नंतर” असा आरोप केल्याची चर्चा आहे. तर काहींनी थेट आयोजन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आवाज चढवला. पाहता पाहता ही नाराजी आपापसातील शाब्दिक वादात बदलली. कोण आधी आला, कोणाला आधी चखणा मिळाला, यावरूनआपापसातच चांगलीच जुंपल्याचे सांगितले जाते. काही क्षणांसाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

या प्रकारानंतर उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती सावरली. “हा फक्त चखण्याचा विषय आहे, उगाच वाद वाढवू नका,” असे सांगून त्यांनी वाद करणार्‍यांना शांत केले.

या घटनेवरून स्थानिक राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते, हा केवळ खाण्याचा प्रश्न नसून, उमेदवाराच्या भोवती असलेल्या गटबाजीचे आणि अंतर्गत असमाधानाचे हे लक्षण आहे. असा दावा केला जात आहे. निवडणुकीच्या धामधुमीत चनाकोलीवाडा आणि चिकनवरून झालेल्या या वादाने मात्र शहरातील राजकीय चर्चांना नवा विषय दिला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...