नाशिक | प्रतिनिधी Nashik
शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )यांनी पुकारलेल्या बंडात कृषिमंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) हे देखील सहभागी झाले आहे.
- Advertisement -
शिवसेने ( Shivsena )विरुद्ध हा बंड असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये असल्याने या बंडात सहभागी मंत्री व आमदारां विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
काही ठिकाणी आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावी अनुचित प्रकार घडू नये यास्तव आज सायंकाळी उशिरा कृषिमंत्री भुसे यांच्या कार्यालयाबाहेर शस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी धडक कृती दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले आहे