Saturday, July 27, 2024
Homeनगरशस्त्रधारी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे मत

शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे मत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील बँका तसेच इतर संस्थांमध्ये असणार्‍या शस्त्रधारी सुरक्षा रक्षक यांना रायफल हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

एक महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ अजित जोशी या निष्पाप तरुण शेतकर्‍याचा अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाच्या रायफलने बळी घेतला. ही घटना सर्वांसाठी धक्कादायक आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, एखादी घटना घडल्यानंतर काळजी घेणे महत्त्वाचे असते. एखाद्याला निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागतो, हे मोठे दुर्दैव आहे.

प्रत्येकाचा जीव इतका स्वस्त झाला आहे काय असा प्रश्न उपस्थित करून सद्या लोकांमधील संवेदना कमी झालेली आहे. आज-काल शस्त्रधारी सुरक्षा रक्षक वॉचमन बनले आहेत. खांद्यावर बंदूक असली तरी त्यांच्याकडून इतर कामे करून घेतली जातात. त्यामुळे बंदुकीची नळी इकडे तिकडे होते. त्यातूनच अशा घटना घडतात.

शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. रायफलचे बॅरल वरच्या दिशेला करून दोन्ही हाताने धरावी लागते. रायफलला सेफ्टी कॅप लावलेली असते. चुकून स्ट्रिगल दाबला तरी तो दाबला जात नाही. सुरक्षारक्षक जे हत्यार वापरतात, त्याची दरवर्षी सर्व्हिसिंग होणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या