Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजस्वातंत्र्य दिनापूर्वी भारतमातेने सुपुत्र गमावला, जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये कॅप्टन दीपक शहीद

स्वातंत्र्य दिनापूर्वी भारतमातेने सुपुत्र गमावला, जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये कॅप्टन दीपक शहीद

जम्मू । Jammu

जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या पटनीटॉपच्या जंगलात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या चकमकीत भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या डोडा येथील पटनीटॉपमधील जंगलामध्ये सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये काल संध्याकाळपासून चकमक सुरू आहे. येथून दहशतवादी हत्यारं सोडून पळाले होते, अशी माहिली लष्करानं दिली आहे घटनास्थळावरून अमेरिकन बनावटीची एम४ रायफल जप्त करण्यात आली आहे. तर तीन बॅगमधून काही स्फोटकंही सापडली आहेत.

हे देखील वाचा : जायकवाडीची चिंता मराठवाड्यापेक्षा नगर-नाशिकला जास्त

दरम्यान, हे दहशतवादी अकर भागातील एका नदीकिनारी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर जवानांनी या भागाला घेराव घातला. लष्कराच्या हालचालींची कुणकूण लागल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात भारतीय सैन्याच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंग (Captain Deepak Singh) गोळ्या लागून गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा : CM अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या