आर्मीच्या बनावट एनओसी प्रकरणी आणखी एक अटकेत

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणात बनावट एनओसी तयार करून देणार्‍या एकास कोतवाली पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. अशपाक अहमद आयुब सय्यद (रा. गोविंदपुरा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो वकील असून त्याने आमिर मिर्झा याच्या नावे बनावट एनओसी तयार करून दिल्याची माहिती समोर आली आहे, असे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी राजा ठाकूर, रोहन धेंडवाल व विनय वराडे यांना अटक केली होती. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आता सय्यद यास अटक करण्यात आली आहे. महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन प्रकरणांमध्ये बनावट एनओसी देऊन फसवणूक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

त्यातील आमिर मिर्झा या नावाने बनावट एनओसी करून देणार्‍या सय्यद यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींच्या बँक खात्याची माहिती पोलिसांकडे प्राप्त झालेली आहे. त्यात लाखो रूपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. त्याच्या चौकशीकडे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *