नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त (Prime Minister Narendra Modi’s birthday)आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार(Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी केले आहे.
जिल्ह्यात होणार्या या आरोग्य मेळाव्यांचे आयोजन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून 17 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 12 शासकीय रूग्णालयांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्या मार्फत 105 ठिकाणी नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य मेळव्यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरबीएसके अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील ज्या बालकांना शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे, अशा सर्व बालकांची तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी वेळ देण्यात येणार आहे. तसेच 18 वर्षे पुढील सर्व लाभार्थ्यांना कोविड लसीकरण उपलब्ध करण्यात येणार आहे.