पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शहरातील कोरडगाव चौकात कारवाई करत पोलिसांनी सुगंधी तंबाखू चारचाकी वाहनासह 4 लाख 34 हजार 812 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी पोलिसांना गुप्त खबर्याकडून पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यासह आठ ते दहा पोलीस कर्मचार्यांनी रात्री साडेआठच्या दरम्यान शहरातील कोरडगाव चौकात अचानक वाहनाची तपासणी चालू केली. याचवेळी नऊच्या सुमारास बीडकडून आलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीची तपासणी करता असताना त्यामध्ये सुगंधी तंबाखू, रजनीगंधा पान मसाला असा 34 हजार 812 रुपयांचा माल जप्त केला.
तसेच 4 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ गाडी पण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी जितिन बाळासाहेब पाटसकर (रा. नाथनगर, पाथर्डी) व चालक गणपत दत्तात्रय गायकवाड (रा. चिंचपूर रोड, पाथर्डी) यांच्यावर पो. कॉ. अल्ताफ शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहेबराव चव्हाण करत आहे.




