Saturday, April 26, 2025
Homeनगरसुवेंद्र गांधी यांना सुनावणीला गैरहजर राहणे भोवले; अटक वॉरंट जारी

सुवेंद्र गांधी यांना सुनावणीला गैरहजर राहणे भोवले; अटक वॉरंट जारी

अहमदनगर (प्रतिनिधी)

व्यावसायिक फर्मशी संबंधित आर्थिक व्यवहारावरून दाखल असलेल्या कंपनी प्राधिकरणापुढील सुनावणीस गैरहजर राहिल्याने भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांना वॉरंट काढण्यात आले आहे.

- Advertisement -

गणपती ट्रेडर्सच्या वतीने आर्थिक व्यवहारापोटी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी कुटुंबीयांच्या मालकीच्या मनसुख मिल्क प्रोसेसिंग प्रा. लि. ढवळगाव (ता. श्रीगोंदा) आणि गांधी फायकार्प या फर्म संबंधित कंपनी प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता. प्राधिकरणाचे न्यायाधीश अन्शुल सिंघल यांच्या समोर वेळोवेळी सुनावणी झाली. सुवेंद्र गांधी हे सुनावणीसाठी गैरहजर होते.

फौजदारी न्याय प्रक्रिया संहितेच्या कलम 82 मधील तरतुदीनुसार प्राधिकरणाने 1 ऑगस्ट 2023 रोजी सुवेंद्र गांधी यांचा जामीन रद्द केला आहे. त्यांना अटक वॉरंट काढले आहे. ते राहत असलेल्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना वॉरंटची कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, आपण वकिलांमार्फत म्हणणे सादर केलेले आहे. प्राधिकरणासमोरील सुनावणीस आपण उपस्थित राहणार आहोत, असे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...