Saturday, May 24, 2025
Homeधुळेदरोडेखोरांच्या टोळीतील दोघे हत्यारांसह जेरबंद

दरोडेखोरांच्या टोळीतील दोघे हत्यारांसह जेरबंद

धुळे Dhule । दि.6 । प्रतिनिधी

- Advertisement -

साक्री शहरातील छत्रपती नगरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणार्‍या टोळीतील दोघांना पोलिसांनी Sakri police सिनेस्टाईल पाठलाग Cinestyle Chase करत पकडले. तर तिघे पसार झाले. त्यांच्याकडून रिक्षासह विविध हत्यारे जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांवर साक्री पोलिसात गुन्हा नोंद Crime record झाला आहे.

साक्री शहरासह परिसरात चोरी व घरफोडी होत असल्याने आज पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास साक्री पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर हे पथकासह शहर परिसरात पेट्रालिंग करीत होते.

त्यादरम्यान त्यांना छत्रपती कॉलनी परीसरात एक ऑटो रिक्षा (क्र. एमएच-18 बीएच 0639) व एका कारमध्ये (क्र. एमएच 15 बीएक्स 5986) काही इसम संशयीतरीत्या दरोडा टाकण्याचे पुर्वतयारीसह फिरतांना दिसले.

पोलिसांचे वाहन पाहताच त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. महामार्गावरील गंगापुर गावाजवळ रिक्षाला पकडले. त्यातील दोघांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी विजयसिंग अंधासिंग सिकलकर (वय-20, रा.टाटा पावर पाईपलाईल, साईचरण कॉलनी, कल्याणपुर्व, जि.ठाणे) व लक्ष्मण रमेश आटोळे (वय 29 वर्षे, रा. पंजाबी कॉलनी, रामनगर, मोहाडी, धुळे) अशी सांगितली.

त्याच्याकडे चाकु, सुरा, टामी, कटर, स्क्रुड्रायव्हर, पाना मिळुन आला. तर रिक्षातील व कारमधील मंगलसिंग सिकलकर, जगपालसिंग उर्फ जन्नतसिंग सिकलकर दोघे (रा.मोहाडी) व एक इसम हे तिघे पसार झाले. त्यांचा शोध सुरु असुन पाचही जणांविरुध्द भादंवी कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर, पोसई आर.व्ही.निकम, बी.बी.नन्हे, पोकॉ विजयसिंग पाटील, चेतन गोसावी, सी.वाय.माळी व सुनिल अहीरे यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

महामार्गावर

राज्य महामार्गावर ‘या’ गाड्यांची टोलपासून मुक्तता होणार; समृध्दी महामार्ग, शिवडी-न्हावा शेवा...

0
मुंबई | Mumbai पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाढणाऱ्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना...