Sunday, January 26, 2025
Homeमुख्य बातम्याराज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात आगमन

राज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यपाल रमेश बैस यांचे किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, मानोरी (नाशिक) येथील हेलिपॅडवर आज सकाळी 9.45 वाजता आगमन झाले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

- Advertisement -

यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानीटकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा,आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनीही स्वागत केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या