Tuesday, June 17, 2025
Homeजळगावखा. राऊतांचे आगमन अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

खा. राऊतांचे आगमन अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या दौर्‍यानिमित्त प्रवक्ते खा. संजय राऊत (spokesperson Sanjay Raut) हे आज जळगावात दाखल झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच शिंदे गटाच्या (Shinde group) पदाधिकार्‍यांनी त्यांना काळे कपडे दाखवत त्यांचा निषेध (Prohibition) केला. यावेळी पोेलिसांनी (police) शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेत गर्दीला पांगविले.

- Advertisement -

.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या दि. 23 रोजी पाचोरा येथे माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरणासाठी दौर्‍यावर येत आहे. त्यांच्या दौर्‍यानिमीत्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रवक्ते खा. संजय राऊत यांचे शुक्रवारी रात्री 8 वा. जळगाव रेल्वेे स्थानकावर आगमन झाले. पालकमंत्री गुलबाराव पाटील यांनी दिलेल्या इशार्‍यामुळे त्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान खा. राऊतांचे आगमन झाले त्यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी काळे कपडे दाखवत त्यांचा निषेध केला. याप्रसंगी गणेश सोनवणे, सरीता माळी, मनोज चौधरी यांच्यासह शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर खा. संजय राऊत यांचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानकावरून खा. संजय राऊत हे थेट जैन हिल्सकडे रवाना झाले

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...