Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यात पावसाचे आगमन

दिंडोरी तालुक्यात पावसाचे आगमन

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्याच्या (Dindori taluka) पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरूणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये (In Farmer’s) आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पेरणी केलेल्या पिकांना (Kharip Sowing) नवसंजीवनी मिळाली आहे.

- Advertisement -

Photogallery : त्र्यंबक परिसर बहरला !

तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मध्यम स्वरूपाचा भिज पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामाना (Farming Working) वेग आला आहे. दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हैराण झाले होते, मात्र सध्या पावसाचे आगमन झाल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात भात आवणीच्या (Rice Sowing) कामाला मोठा वेग आला आहे.

भात आवणी करताना गाळ करण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असते, परंतु सध्या पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे तसेच भाताचे रोप जास्त दिवसाचे झाल्यामुळे बळीराजाने जास्त पावसाची वाट न पाहता कमी पावसावर भात आवरणीला प्रांरभ केला आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील भात उत्पादक शेतकरी भात पिकाकडे व्यापारी दृष्टीकोन ठेवून सध्या भातशेती करित असल्याचे दिसून येत यासाठी शेतकरी ज्या जातीच्या तांदळाला बाजारात जास्त मागणी आहे.

अशा जातीचे भात बियाणे खरेदी करून रोप टाकले जाते. यात इंद्रायणी, कोळपी, दप्तरी, भोगावती, महालक्ष्मी, लालकोर अशा विविध जातीचे बियाणे टाकली जातात. गेल्या तीन ते चार वर्षापासून या परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी इंद्रायणी जातीच्या भाताला मोठ्याप्रमाणात पंसती दिल्याचे दिसून येत आहे.

या भागातील शेतकरी भात शेतीसाठी कुंडी वाफा, दलदल वाफा, जमिन पायरी टप्प्यात वाफा पद्धतीने भात शेती लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी संततधार पावसाची खूप गरज असते.

दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात अशा स्वरूपाचा पाऊस कायमच पडत असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे या परिसराला भाताची नगरी म्हणून ओळखले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या