राज्यात डाळिंबाच्या हंगामाला प्रारंभ झाला असून डाळिंबांना 65 ते 70 रुपये प्रतिकिलो इतका भाव मिळत आहे. विशेषत: निर्यात दर्जाची डाळिंबं चांगलीच भाव खाऊन आहेत.
या डाळिंबांना 120 रुपये किलोपर्यंत उचांकी मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाटी, नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेडा तालुक्यात उत्तम दर्जाच्या डाळिंबांचं उत्पादन होत असून त्यांची मध्यपूर्व देश, आखाती देशात तसंच युरोपीय देशांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
साहजिक शेतकर्यांना अशा डाळिबांच्या पिकातून चांगलं उत्पादन मिळतं; परंतु चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात डाळिंबांच्या बागांचं प्रचंड नुकसान झाल्यानं उत्पादनात मोठी घट झाली.
परिणामी बाजारातील डाळिंबांची आवक मंदावली आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम डाळिंबाच्या शोधासाठी देशातील व्यापारी तसंच मध्यस्थ शेतकर्यांच्या बांधावर येत आहेत. अ
शा डाळिंबांच्या खरेदीसाठी पश्चिम बंगाल, ओडिसा आदी राज्यातील तसंच दिल्लीतील व्यापार्यांनी तळ ठोकला आहे. एवढंच नाही तर युरोपीय देशांसाठी डाळिंबांची निर्यात करणारे व्यापारीसुद्धा गावगावात डाळींबांची खरेदी करण्यासाठी फिरत आहेत.
वास्तविक डाळिंबाचे भाव गेल्या महिन्यात 40 ते 50 रूपये प्रति किलोपर्यंत खाली आले होते; मात्र गेल्या ाठवड्यापासून डाळिबांच्या भावात वाढ होत आहे.
यंदा उत्पादन कमी झाल्यानं डाळिंबांचे भाव आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. डाळिंबांच्या विविध वाणांमध्ये भगवा डाळिंबासाठी 65 ते 70 रुपये प्रति किलो इतका दर असून युरोपमधील निर्यातीसाठी 120 रुपये प्रति किलो इतका दर प्राप्त होत आहे. अशा स्थितीत निर्यातक्षम डाळिंबांचं उत्पादन घेणार्या शेतकर्यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे.