मुंबई l Mumbai
राज्याच्या राजकारणात (Movie on Maharastra Politics) मागील काही दिवसात अशा काही घडामोडी होतील याची कल्पना कोणालाच नव्हती. कुणालाच शेवटपर्यंत माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला.
आता याचं सत्तानाट्यावर प्लॅनेट मराठी ओटीटीवर एक वेब सीरिज (New Marathi web series) प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे चित्र दाखवणारी ही वेब सिरीज ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) याच नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी केले आहे. नुकताच या वेबसिरीज चा एक टीझर रिलीज झाला आहे.
टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. (New Marathi web series politics)
या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे (Sayaji Shinde), उपेंद्र लिमये (Upendra Limaye), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सिद्धार्थ जाधव (Sidharth jadhav), प्रभाकर मोरे (Prabhakar More), अमित तडवळकर, रमेश वाणी (Ramesh Wani), संजय कुलकर्णी (Sanjay Kulkarni), राजेश दुर्गे (Rajesh Durge), राजेंद्र गुप्ता (Rajendra Gupta), रुचिता जाधव (Ruchita Jadhav), सीमा कुलकर्णी (Seema Kulkarni) आणि दिप्ती क्षीरसागर (Dipti Kshirsagar) यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.